सोयाबीन खरेदी आजपासून बंद
केंद्र सरकारने आजपासून सोयाबीन खरेदी बंद केली आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नाफेडच्या अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात गदारोळ केला आहे.
सरकारचे धोरण चुकीचे
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''सरकारचे धोरण चुकीचे आहे. सरकारने संपूर्ण सोयाबीन खरेदी करणे गरजेचे होते. पण तसं झाले नाही. 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन राज्यात झालेले आहे. त्यातून फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारने शेतकऱ्यांचा संयम सुटण्याचा वाट पाहू नये. नाहीतर शेतकरी मुंबईत मोर्चा काढतील''. असा इशारा तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
advertisement
दरम्यान, आता शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढ मिळाली नाही तर त्यांना कमी दराने खुल्या बाजारात आपले उत्पादन विकावे लागणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. राज्याच्या पणन मंडळाने केंद्राकडे 13 तारखेपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहावी यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे.