TRENDING:

गोकुळ दूध संघटनेकडून गायीच्या दुधात 3 रुपयांची कपात, सर्वसामान्य शेतकरी म्हणाले, हा निर्णय...

Last Updated:

golul milk kolhapur - एकंदरीतच या दरात कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकरी रुपेश पाटील यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक संपताच गोकुळ दूध संघटनेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. गोकुळ दूध संघटनेने गायीच्या खरेदी दरात 3 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी गोकुळ गाईचे दूध 33 रुपयांनी खरेदी करत होते. मात्र, आता या निर्णयामुळे गोकुळ 30 रुपयांनी गाईचे दूध खरेदी करणार आहे.

advertisement

एकंदरीतच या दरात कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकरी रुपेश पाटील यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला.

राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 पासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ.करिता किमान प्रतिलिटर 28 रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये दराने गाय दूध खरेदी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ 33 रुपये दर देत आहेत. तो 6 रुपये जास्त आहे. या जास्तीच्या दरामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही.

advertisement

sangli farmer : 1 एकरात पिकवली 43 क्विंटल बाजरी, सांगलीच्या शेतकऱ्याचा राज्यात विक्रम

त्याचबरोबर गाय आणि म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथून पुढेही गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल, परंतु दूध पावडर व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ दिसून येत नसल्याने खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघांनी घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

advertisement

10 मिली ऍक्युरिसीचे वजन काटे बसवा -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

दुधाचे मोजमाप योग्य रीतीने व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही 10 मिली ऍक्युरसीचे वजन काटे बसवण्याची मागणी संघाकडे करतो आहोत. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र, याला दूध संघाचा विरोध आहे. या काटामारी पद्धतीमुळ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे हा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
गोकुळ दूध संघटनेकडून गायीच्या दुधात 3 रुपयांची कपात, सर्वसामान्य शेतकरी म्हणाले, हा निर्णय...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल