वाफळे गावात राहणारे गोपीनाथ नवनाथ चव्हाण हे गेल्या 15 वर्षांपासून बोरांची शेती करत असून गोपीनाथ यांनी उमरान आणि चमेलीच्या बोरांची बाग केली होती. या बोरांना बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी 5 वर्षांपूर्वी उमरान आणि चमेली या झाडांची छाटणी करून त्यांनी चेकनेट या जातीच्या बोरांच्या झाडाची कलम भरून घेऊन लागवड केली. चेकनेट बोरांच्या झाडांवर भुरी हा रोग होऊ नये म्हणून प्रत्येक दहा ते बारा दिवसाला फवारणी करून घेण्यात येते.
advertisement
Success Story : शिक्षण घेत असताना केली शेती, कांदा शेतीचा प्रवीणचा प्रयोग यशस्वी, वर्षाला 4 लाख नफा
चेकनेट बोरांची तोडणी करून पुणे, हैदराबाद येथील बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येते. सध्या चेकनेट बोरांना बाजारात 80 ते 90 रुपये किलो दराने दर मिळत आहे. डिसेंबरच्या महिन्यात या चेकनेट बोरांना दर कमी असतो, तर जानेवारीमध्ये संक्रांतीच्या अगोदर याच बोरांना 100 ते 120 रुपये किलो दराने भाव मिळतो. चेकनेट बोर खाण्यास गोड असल्याने याची मागणी जास्त आहे. चेकनेट बोराच्या लागवडीसाठी गोपीनाथ चव्हाण यांना 5 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता.
तर या बागेची लागवड करून पाच वर्षे पूर्ण झाले असून लागवडीचा खर्च वजा करून गोपीनाथ चव्हाण यांना आतापर्यंत या बोरांच्या विक्रीतून 5 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. उमरान आणि चमेली या बोरांची लागवड न करता शेतकऱ्यांनी एकदा चेकनेट बोरांची लागवड केल्यास अधिक नफा मिळेल, असा सल्ला शेतकरी गोपीनाथ चव्हाण यांनी दिला आहे.





