31 जुलैपर्यंत विमा अर्ज भरण्याची अंतिम संधी
पीकविमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्यांनी 31 जुलै 2025 पर्यंत विमा हप्ता भरून अर्ज सादर करावा. योजना राबवण्याची जबाबदारी भारतीय कृषी विमा कंपनी कडे देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत खरीप हंगामातील अधिसूचित पिके म्हणजे बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका आणि कांदा यांचा समावेश आहे. अधिसूचित गावांमधील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
advertisement
कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! वाचा सविस्तर
कोण अर्ज करू शकतो?
योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी खुली आहे. योजनेचा सहभाग ऐच्छिक असून, अर्ज करण्यासाठी अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी अनिवार्य आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. जसे की,
अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक
सातबारा उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र
कोणती पिके विम्यासाठी पात्र?
खरीप हंगामात अधिसूचित करण्यात आलेली खालील पिके विम्यासाठी पात्र आहेत बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका, कांदा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी आणि जे अधिसूचित गावांमध्ये राहतात, त्यांनीच या योजनेसाठी अर्ज करावा.
अर्ज कुठे करायचा?
या कागदपत्रांसह शेतकरी अधिकृत बँक शाखांमध्ये किंवा सामान्य सेवा केंद्र (CSC), आपले सरकार सेवा केंद्र, अथवा https://pmfby.gov.in या पोर्टलवरूनही अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मदत केंद्रांची माहिती
पीकविमा योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी खालील पर्यायांचा वापर करावा.
कृषी मंत्रालयाचे हेल्पलाईन क्रमांक: 14447
भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी
दरम्यान, या योजनेमुळे शेतकऱ्यांना हवामान बदलांच्या अनिश्चिततेमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळते. काची नासधूस झाल्यास विमा भरपाईचा लाभ घेता येतो. त्यामुळे योजनेचा भाग होऊन शाश्वत शेती व सुरक्षित उत्पन्न साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
