TRENDING:

आयुष्यभराची कमाई एकदाच! कमी खर्चात एक एकरात हे ६०० रोपं लावा, ३० कोटीपर्यंत उत्पन्न मिळवा

Last Updated:

Agriculture News : बदलत्या काळानुसार शेतीतही परिवर्तन घडताना दिसत आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून राहण्याऐवजी अनेक शेतकरी आता नावीन्यपूर्ण आणि दीर्घकालीन नफा देणाऱ्या शेतीकडे वळले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Agriculture News
Agriculture News
advertisement

मुंबई : बदलत्या काळानुसार शेतीतही परिवर्तन घडताना दिसत आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून राहण्याऐवजी अनेक शेतकरी आता नावीन्यपूर्ण आणि दीर्घकालीन नफा देणाऱ्या शेतीकडे वळले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेची माहिती आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर शेती हा एक फायदेशीर उद्योग ठरू शकतो, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. अशाच उच्च उत्पन्न देणाऱ्या शेती प्रकारांपैकी एक म्हणजे चंदनाची लागवड. सुगंध, औषधी गुणधर्म आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठी मागणी यामुळे चंदनाला “हरित सोनं” म्हणून ओळखले जाते.

advertisement

देशात चंदन लागवडीची परंपरा प्रामुख्याने कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये आढळते. या राज्यांतील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून चंदनाची लागवड स्वीकारली असून आज ते लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. चंदनाचे लाकूड, तेल आणि त्यापासून तयार होणारी उत्पादने औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने, सुगंध उद्योग तसेच धार्मिक विधींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यामुळे चंदनाला देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे.

advertisement

लागवडीचे नियोजन कसं करावे?

चंदन लागवडीसाठी योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ही लागवड वर्षभर करता येत असली तरी पावसाळ्याच्या सुरुवातीचा कालावधी अधिक अनुकूल समजला जातो. लागवडीसाठी वापरले जाणारे रोप किमान दोन वर्षांचे, निरोगी आणि प्रमाणित नर्सरीतून घेतलेले असावे. चंदनाचे झाड पाण्यात साचणाऱ्या जमिनीत तग धरू शकत नाही, त्यामुळे निचऱ्याची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित सिंचन, तणनियंत्रण आणि संरक्षण केल्यास झाडांची वाढ उत्तम होते.

advertisement

चंदन हे अर्धपरजीवी झाड असल्याने त्याच्या आजूबाजूला काही मदतनीस झाडांची लागवड करणे आवश्यक असते. तूर, कडधान्ये किंवा इतर झाडे सहाय्यक म्हणून लावल्यास चंदनाच्या वाढीस मदत होते. पहिल्या ४ ते ५ वर्षांत उत्पन्न दिसत नसले तरी त्यानंतर झाडांची वाढ स्थिर होत जाते. साधारणतः १२ ते १५ वर्षांनंतर चंदनाची काढणी करता येते.

advertisement

एका झाडापासून ५ ते ६ लाखांचे उत्पन्न

चंदन शेतीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिचा आर्थिक फायदा. एका चंदनाच्या झाडापासून सरासरी ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. एका एकरात सुमारे ५०० ते ६०० झाडे लावता येतात. यानुसार योग्य व्यवस्थापन केल्यास एका एकरातून २५ ते ३० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. जरी हा नफा दीर्घकालीन असला तरी संयम आणि नियोजन ठेवल्यास चंदन शेती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकते.

चंदन लागवडीसाठी अत्यंत सुपीक जमीनच लागते असे नाही. माळरान, डोंगराळ, ओसाड किंवा पारंपरिक पिकांसाठी अनुपयुक्त असलेली जमीनही चंदन लागवडीसाठी वापरता येते. त्यामुळे पडिक जमिनीचा उपयोग करून उत्पन्न वाढवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. शासनाकडून चंदन लागवडीसाठी परवाने, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. योग्य माहिती आणि नियोजनाच्या आधारे चंदन शेती स्वीकारल्यास पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पटीने जास्त उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांती का साजरी केली जाते? धार्मिक परंपरा आणि वैज्ञानिक कारण, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
आयुष्यभराची कमाई एकदाच! कमी खर्चात एक एकरात हे ६०० रोपं लावा, ३० कोटीपर्यंत उत्पन्न मिळवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल