शेतकरी प्रमाणपत्राचे फायदे काय आहेत?
1) कृषी शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना शेतकरी प्रमाणपत्राचा फायदा होतो.
2) जमीन खरेदी करताना शेतकरी प्रमाणपत्र आवश्यक असते.
3 विविध कृषी अनुदान योजना व सवलतींसाठी प्रमाणपत्र आवश्यक असते.
शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?
तुम्हाला सेतू केंद्रामार्फत अर्ज सादर करता येतो.https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो.
advertisement
आवश्यक कागदपत्रे कोणती?
1) पॅन कार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र
2) पत्ता दर्शवणारा पुरावा जसे की, रेशन कार्ड, वीज बील, पाणी बील, सातबारा उतारा, 8 अ उतारा, घर पावती
3) जमीन संबंधित सातबारा किंवा 8 अ उतारा
4) स्वंयघोषणापत्र
अर्ज कसा करायचा?
तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नवीन वापरकर्ता नोंदणी करताना नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा. महसूल विभाग निवडून शेतकरी प्रमाणपत्र पर्यायावर क्लिक करा. पुढे जाऊन आवश्यक कागदपत्रे (75 केबी ते 500 केबी दरम्यान) अपलोड करा. नंतर सर्व माहिती तपासून अर्ज ऑनलाईन सादर करा आणि शुल्क भरा. नंतर पावती जपून ठेवा
प्रमाणपत्र येण्याचा कालावधी किती असतो?
तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळेल. तसेच प्रमाणपत्र न मिळाल्यास आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून अपील अर्ज सादर करता येईल. शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्याची ही प्रक्रिया सोपी असून, शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे.