TRENDING:

PM Modi Birthday: सगळं आसमंत झालं 'मोदीमय', पुणेकरांनी पहिल्यांदाच अनुभवला हाच तो 1000 ड्रोनचा शो VIDEO

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी एक अनोखी आणि अविस्मरणीय भेट दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी एक अनोखी आणि अविस्मरणीय भेट दिली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून पुण्यात प्रथमच तब्बल 1000 ड्रोनचा शो आयोजित करण्यात आला. एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाने पुणेकरांची मने जिंकली.
advertisement

हा शो पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक मैदानावर जमले होते. आकाशात एकाच वेळी झेपावलेल्या हजार ड्रोननी जे दृश्य निर्माण केले, ते पाहून प्रत्येकजण थक्क झाला. या ड्रोन शोमध्ये भारतीय संस्कृती, इतिहास आणि आधुनिक भारताची वाटचाल या सर्व गोष्टींचा सुंदर संगम दिसून आला.

Pune News : 'शेतमाल निर्यात वाढीसाठी निर्यात सुविधा केंद्र सक्षम करा', पणन मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

advertisement

शोदरम्यान प्रथम संत परंपरेचे दर्शन घडले. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमा ड्रोनच्या माध्यमातून उभ्या राहिल्या. त्यानंतर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचा संदेश आकाशात साकारला गेला. मराठी मातीचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, देशासाठी लढलेले लोकमान्य टिळक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे प्रतिबिंब आकाशात झळकले.

advertisement

इतिहासाबरोबरच आधुनिक भारताचे प्रतीक मेक इन इंडिया या लोगोची झलकही ड्रोननी दाखवली. याशिवाय अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन, तसेच 2047 सालच्या विकसित भारताच्या संकल्पनेचे चित्रण या शोमधून प्रेक्षकांसमोर आले. या प्रत्येक कलाकृतीकडे लोकांनी मंत्रमुग्ध होऊन पाहिले.

ड्रोनच्या माध्यमातून एकामागोमाग एक प्रतिमा साकारताना नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान स्पष्ट जाणवत होता. भारताची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि भविष्याची स्वप्ने या सर्वांचा संगम या शोमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे मोदींना दिलेली ही वाढदिवसाची भेट खरोखरच अद्वितीय ठरली.

advertisement

या शोमध्ये ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृतीही पाहायला मिळाली. महाराष्ट्रात यापूर्वी अशा स्वरूपाचा ड्रोन शो झाला नव्हता. त्यामुळे अनेकांसाठी ही एक नवीन आणि अविस्मरणीय अनुभूती होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी उत्साहाने पाहिला आले होते.

पुणेकरांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या अविस्मरणीय दृश्यांची नोंद करून ठेवली. सोशल मीडियावर देखील ड्रोन शोची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले. पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी केलेली ही अभिनव कल्पना केवळ पुण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी ठरली.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
PM Modi Birthday: सगळं आसमंत झालं 'मोदीमय', पुणेकरांनी पहिल्यांदाच अनुभवला हाच तो 1000 ड्रोनचा शो VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल