TRENDING:

घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस

Last Updated:

Job Card : सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधण्याचे काम सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधण्याचे काम सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉब कार्ड. तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे. त्यामुळे 'जॉब कार्ड कसे काढायचे?' हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. खाली त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया दिली आहे.
News18
News18
advertisement

जॉब कार्ड काढण्यासाठी काय करावे?

जॉब कार्ड मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. तिथे मनरेगा (MNREGA) अंतर्गत ग्राम रोजगार सेवकाकडे अर्ज करावा लागतो. अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता भासते.

आधार कार्ड (सर्व कुटुंबीयांचे)

बँक पासबुक (जनधन खाते असल्यास प्राधान्य)

पासपोर्ट साईझ फोटो (2 प्रती)

रहिवासी प्रमाणपत्र (कधी कधी विचारले जाते)

advertisement

जॉब कार्ड अर्ज फॉर्म (ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध)

अर्ज भरल्यानंतर तो ग्राम रोजगार सेवकाकडे जमा करावा. तपासणीनंतर काही दिवसांत तुम्हाला जॉब कार्ड दिले जाईल आणि एक युनिक जॉब कार्ड नंबर मिळेल.

जॉब कार्ड नंबर ऑनलाइन कसा पाहावा आणि डाऊनलोड कसे करावे?

तुम्ही घरबसल्या तुमचा जॉब कार्ड नंबर पाहू आणि कार्डही डाउनलोड करू शकता. त्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबा:

advertisement

Maharashtra NREGA च्या अधिकृत संकेतस्थळावर (nrega.nic.in) भेट द्या.

मुख्य पृष्ठावर "Generate Reports" या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर राज्यांच्या यादीतून “Maharashtra” राज्य निवडा.

पुढील पृष्ठावर वर्ष, जिल्हा, तालुका, ब्लॉक, आणि पंचायत यांची माहिती भरावी.

माहिती भरल्यानंतर "Proceed" या बटणावर क्लिक करा.

आता उघडलेल्या पेजवर “R1 Job Registration” हा पर्याय शोधा.

त्याखालील "Job Card / Employment Register" या लिंकवर क्लिक करा.

advertisement

यामध्ये तुम्हाला तुमच्या गावातील सर्व व्यक्तींची यादी आणि त्यांचे जॉब कार्ड क्रमांक दिसतील. तिथून तुमचे नाव शोधून समोर दिलेला जॉब कार्ड नंबर लिहून ठेवा. तुम्ही हवे असल्यास ते कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोडही करू शकता.

घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड का आवश्यक आहे?

घरकुल योजना, विशेषतः पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निवडताना मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड असलेल्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जॉब कार्ड हे केवळ कामासाठीच नव्हे, तर सरकारी योजनांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी देखील महत्त्वाचे कागदपत्र ठरते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल