पुणे : उन्हाळा सुरु झाला की आंब्याला मोठी मागणी असते आणि बाजारात ठिकठिकाणी हापूस आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु, अनेक वेळा खरा हापूस आंबा आणि अन्य प्रकारातील आंब्यात फरक ओळखणे कठीण जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. सध्या काही शेतकरी ‘GI टॅग’ मिळवून ही फसवणूक टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काही वेळा GI टॅग नसलेला पण अस्सल हापूस आंबा सुद्धा बाजारात येतो, तर तो कसा ओळखण्याचा याबाबत जाणून घेऊ.
advertisement
ओरिजनल देवगड हापूस
देवगड हापूस आंब्याचा आकार हा नेहमीच विशिष्ट असतो. त्याचा वरचा भाग किंचित उंच तर देठाकडे खोलगट असतो, तर खालचा भाग निमुळता आणि गुळगुळीत असतो. याशिवाय त्याची साल खूपच पातळ असते आणि आतमधला गर केशरी रंगाचा व रसाळ असतो. या आंब्याला नैसर्गिक गोडसर सुवास असतो जो तयार झाल्यावर लगेच जाणवतो. हापूस आंब्याचा स्वाद हा इतर आंब्यांच्या तुलनेत अधिक गोडसर, सुगंधी आणि ताजा असतो, असे देवगडचे शेतकरी उत्तम सावंत सांगतात.
Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पुण्यात किती मिळतोय भाव?
कसा मिळतो GI टॅग
सध्या देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणूक होतेय. त्यासाठी कोकणचा हापूस जीआय टॅग लावून विकला जातोय. GI टॅग म्हणजे 'जिओग्राफिकल इंडिकेशन' जो विशिष्ट भागात पिकणाऱ्या उत्पादन ओळखीचं अधिकृत प्रमाणपत्र असतं. जर शेतकऱ्यांना GI टॅग मिळवायचा असेल तर त्यांच्याकडे किमान 100 पेक्षा जास्त कलम केलेल्या आंब्याची झाडं असणं आवश्यक आहे. तसेच सातबारा उतारा देखील आवश्यक असतो. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुमारे सहा महिन्यात GI सर्टिफिकेट मिळते. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही जागरूक होत आहेत.
देवगड हापूसचा दर काय?
सध्या देवगड हापूस आंब्याची बाजारात विक्री 700 ते 1200 रुपये प्रति डझन दराने होत आहे. त्यामुळे ओरिजनल हापूस ओळखूनच खरेदी करणे गरजेचे आहे, अशी माहिती शेतकरी उत्तम सावंत यांनी दिली आहे.