हवामान अंदाज काय?
पुढील 4-5 दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने घट अपेक्षित आहे. किमान तापमानात विशेष बदल होणार नाही.
कृषी सल्ला काय आहे?
शेतात व फळबागेत पाणी साचू देऊ नये.
अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
फवारणीची कामे 2 दिवस थांबवावीत किंवा पावसाची उघडीप पाहूनच करावीत.
advertisement
पीक व्यवस्थापन कसं कराल?
1) सोयाबीन
शेतात पाणी साचू देऊ नये. पाने खाणाऱ्या अळीवर नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क / अझाडिरेक्टिन (1500 PPM) फवारणी. प्रादुर्भाव जास्त असल्यास शिफारसीतील कीटकनाशकांचा आलटून-पालटून वापर करा. पांढरी माशी नियंत्रणासाठी प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.पिवळा मोझॅक रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
2) खरीप ज्वारी
पाण्याचा निचरा करावा. लष्करी अळी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% किंवा स्पिनेटोरम ११.७% एससी फवारणी.
3) बाजरी
पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) ऊस
पांढरी माशी व पाकोळी नियंत्रणासाठी लिकॅनीसिलियम लिकॅनी (जैविक बुरशी) फवारणी.
पर्यायी रासायनिक उपाय : क्लोरोपायरीफॉस / इमिडाक्लोप्रिड / अॅसीफेट. पोक्का बोइंग रोगासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड याची फवारणी करावी
5) हळद
पाण्याचा निचरा करावा. पानावरील ठिपके व करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब. कंदमाशी नियंत्रणासाठी क्विनालफॉस किंवा डायमिथोएट आलटून-पालटून वापर.
फळबाग व्यवस्थापन
1) संत्रा/मोसंबी
पाण्याचा निचरा करावा. किड नियंत्रणासाठी डायकोफॉल फवारणी करावी. तसेच फळवाढीसाठी 00:52:34 खत व जिब्रेलिक अॅसिड फवारणी करावी
2) डाळींब
अतिरिक्त फुटवे काढावेत. 19:29:29 खत सूक्ष्म सिंचनाद्वारे द्यावे.
3) भाजीपाला
शेतात पाणी साचू देऊ नये.काढणीस तयार पिके लगेच काढावीत. शेंडा व फळ पोखरणारी अळी प्रादुर्भावग्रस्त फळे नष्ट करावीत. कामगंध सापळे व शिफारसीतील कीटकनाशकांचा वापर करावा. भेंडीवरील पावडरी मिल्ड्यू रोगासाठी मायक्लोब्यूटॅनिल फवारणी करावी.