लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण मोहीम सुरू
राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना यांतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. सध्या जालना जिल्ह्यात एकूण 1,30,205 लाभार्थी नोंदणीकृत आहेत. मात्र, यातील 27,312 लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. यामुळे हे लाभार्थी DBT प्रणालीद्वारे मिळणाऱ्या सरकारी आर्थिक सहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
advertisement
88% लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली
जिल्ह्यातील 67,174 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर एकूण 88% लाभार्थ्यांनी आपले KYC अपडेट केले आहे. अजूनही आधार लिंकिंग प्रक्रिया अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांनी त्वरीत बँक व आधार संलग्नीकरण करून वित्तीय सहाय्य निश्चित करावे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
आधार लिंकिंगसाठी मार्गदर्शक प्रक्रिया
लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जमा करावा. तसेच, ऑनलाइन पद्धतीने आधार-बँक लिंकिंग स्टेटस तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
https://myaadhaar.uidai.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करा. नंतर आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करा. OTP प्रविष्ट करा (हा OTP आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर पाठवला जाईल). Bank Seeding Status वर क्लिक करून आधार तुमच्या कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे याची माहिती मिळवा.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
आधार लिंकिंग केल्याने DBT प्रणालीद्वारे आर्थिक सहाय्य थेट खात्यात जमा होईल. सरकारी योजनेचा लाभ नियमित मिळण्यासाठी आधार लिंकिंग अनिवार्य आहे. 14 सप्टेंबर 2025 पर्यंत विनामूल्य आधार पत्ता सुधारणा करता येईल. बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासून, त्रासमुक्त बँकिंगचा लाभ घ्या.
