TRENDING:

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Video

Last Updated:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांच्या पिंडीवर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात व काय टाळावे याबद्दलच आदित्य जोशी गुरुजी यांनी मार्गदर्शन केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: यंदाची महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.
advertisement

महाशिवरात्री म्हणजे ‘शिवाची रात्र’- या दिवशी मध्यरात्री विशेष पूजन केले जाते. भक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि भगवान शिवाची आराधना करतात. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांच्या पिंडीवर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात व काय टाळावे? याबद्दलच आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल18 च्या माध्यमातून सांगितले आहे.

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त

आदित्य जोशी गुरुजी यांच्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजून 28 मिनिटांनी महाशिवरात्रीचा विशेष मुहूर्त सुरू होईल आणि 1 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील. या कालावधीत जागृत राहून भगवान शिवाची पूजा, जप आणि अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते.

advertisement

या दिवशी काय करावे?

महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करून शिवलिंगाची विधीवत पूजा करावी. शिवाला गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे दूध अर्पण करावे, काळे तीळ वाहावेत आणि बिल्वपत्र (बेलपत्र) अर्पण करावे. नैवेद्य म्हणून केळी किंवा गूळ अर्पण करणेही मंगल मानले जाते. गंगाजल, दूध, काळे तीळ आणि बिल्वपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय द्रव्य मानले जातात. श्रद्धेने ही अर्पणे केल्यास भगवान शिवाची कृपा लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे.

advertisement

जप आणि स्तोत्रपठण

मध्यरात्रीच्या मुहूर्तात रुद्राष्टक स्तोत्र, शिव पंचाक्षरी मंत्र — “ॐ नमः शिवाय”, शिव महिम्न स्तोत्र व मंत्र म्हणणे लाभदायक मानले जाते. या दिवशी शक्य असल्यास रात्रभर जागरण करून शिवनामाचा जप करावा.

काय करू नये?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

भगवान शिवाची पूजा करताना लाल रंगाची फुले किंवा रक्तवर्णी वस्तू अर्पण करू नयेत, शिवलिंगावर कुंकू लावू नये, अतिरेकी किंवा अनावश्यक वस्तू शिवपिंडीवर अर्पण करू नयेत. श्रद्धेपोटी अनेकदा विविध वस्तू अर्पण केल्या जातात, मात्र शास्त्रानुसार मर्यादित आणि योग्य वस्तूच अर्पण करणे योग्य मानले जाते.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल