मक्याच्या दरात काहीशी वाढ: राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 15 हजार 167 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी धुळे मार्केटमध्ये 5 हजार 601 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1326 ते जास्तीत जास्त 1790 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 360 क्विंटल मक्यास 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मक्याला गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज वाढ झाली आहे.
advertisement
कांद्याचेही दर वाढले: राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज 1 लाख 81 हजार 962 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 41 हजार 135 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 200 ते 2706 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 37 हजार 680 क्विंटल लाल कांद्यास आज 3000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी वाढ दिसून येत आहे.
सोयाबीनच्या सर्वाधिक दरात सुधारणा: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 48 हजार, 765 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी वाशिम मार्केटमध्ये 10 हजार 800 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4220 ते 4738 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 123 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोयाबीनच्या दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.