TRENDING:

Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?

Last Updated:

Krishi Market: राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात थंडीचा कडाका वाढला असतानाच कृषी मार्केटमध्ये मोठे उलटफेर दिसत आहेत. शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली. यातील गूळ, शेवगा आणि आल्याची आवक आणि बाजारभाव याबाबतचं अपडेट जाणून घेऊया.
advertisement

गुळाच्या आवकेत सुधारणा 

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3750 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 2010 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4350 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 665 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

Success Story: 20 गुंठ्याच्या झेंडू फुलाच्या शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न, कमी जागेत पिकवले भरघोस पीक

advertisement

शेवग्याचा तोरा कायम 

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 7 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास सर्वाधिक 35000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल शेवग्यास 18000 ते 20000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

आल्याची आवक स्थिर 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1611 क्विंटल आल्याची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 924 क्विंटल आल्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 5400 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 6000 ते 7000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. पुढील महिनाभर आल्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आले बाजारातील जाणकार सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल