Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Krishi Market: राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
मुंबई: राज्यात थंडीचा कडाका वाढला असतानाच कृषी मार्केटमध्ये मोठे उलटफेर दिसत आहेत. शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली. यातील गूळ, शेवगा आणि आल्याची आवक आणि बाजारभाव याबाबतचं अपडेट जाणून घेऊया.
गुळाच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3750 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 2010 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4350 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 665 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याचा तोरा कायम
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 7 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास सर्वाधिक 35000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल शेवग्यास 18000 ते 20000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
आल्याची आवक स्थिर
view commentsआज राज्याच्या मार्केटमध्ये 1611 क्विंटल आल्याची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 924 क्विंटल आल्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 5400 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 6000 ते 7000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. पुढील महिनाभर आल्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आले बाजारातील जाणकार सांगतात.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 8:59 PM IST









