Bhimashankar Temple: भिमाशंकरमध्ये सिक्युरिटी गार्ड्सची मुजोरी; महिला भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल

Last Updated:

भीमाशंकर देवस्थानात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षिकेवर सिक्युरिटी गार्डांकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bhimashankar Temple: भिमाशंकरमध्ये सिक्युरिटी गार्ड्सची मुजोरी; महिला भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
Bhimashankar Temple: भिमाशंकरमध्ये सिक्युरिटी गार्ड्सची मुजोरी; महिला भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर देवस्थानाबाबतची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भीमाशंकर देवस्थानात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षिकेवर सिक्युरिटी गार्डांकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षिका आणि सेक्युरिटी गार्ड यांच्यात झालेल्या मारहाणीत शिक्षिकेचा पती, मुलगा यांनाही मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, मंदिराच्या सेक्युरिटी गार्डकडून त्या महिला शिक्षिकेला मारहाण करुन मोबाईल फोडून नुकसान केल्याचीही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराजवळ झालेल्या ढकला ढकलीबाबत विचारणा केल्यावर निळा शर्ट, काळे जॅकेट घातलेल्या व्यक्तीसह 4 पुरुष व 3 महिला गार्ड्सनी मारहाण केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकाराप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
advertisement
दरम्यान, नवीन वर्षापासूनच म्हणजेच, 1 जानेवारी 2026 पासून पुण्याच्या भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहणार आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये या मंदिरात अनेक विकास कामं केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून कामाला सुरूवात होणार असून पुढच्या तीन महिन्यांपर्यंत हे काम चालणार आहेत. नवीन वर्ष सुरू होत असल्याने भीमाशंकर मंदिराचे विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे केले जाणार आहेत. भीमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम केले जाणार आहेत.
advertisement
मंदिराच्या सभा मंडपाचे काम करत असताना कोणत्याही भाविकाला इजा पोहोचू नये, यासाठी मुख्य दर्शनासाठी मंदिर तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात भाविकांना येण्यासाठी बंदी घातली आहे. पुढच्या आठ दिवसांमध्ये, प्रशासकीय पातळीवर पाहणी करून मंदिराच्या बांधकामाचं नियोजन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील कामांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Bhimashankar Temple: भिमाशंकरमध्ये सिक्युरिटी गार्ड्सची मुजोरी; महिला भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
Next Article
advertisement
साहिबजादे हे धार्मिक कट्टरतेविरुद्ध धैर्याचं सर्वोच्च प्रतीक आहेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी
साहिबजादे हे धार्मिक कट्टरतेविरुद्ध धैर्याचं सर्वोच्च प्रतीक आहेत: मोदी
  • पंतप्रधान मोदींनी साहिबजाद्यांना धार्मिक कट्टरतेविरुद्ध धैर्याचं सर्वोच्च प्रतीक म्हटलं आहे.

  • वीर बाल दिवसाच्या निमित्ताने साहिबजाद्यांच्या शौर्य, त्याग आणि वीरतेचा देशभर सन्मान केला जातो.

  • गुरु गोबिंद सिंह यांच्या चारही साहिबजाद्यांनी क्रूर मुघल सत्तेविरुद्ध अपार धैर्य दाखवलं.

View All
advertisement