राज्यातील दस्तनोंदणी आणि महसूल संकलन
दरवर्षी राज्यात जवळपास तीन लाख दस्त नोंदणी होतात, ज्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. 2024 -25 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 55,000 कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 2.41 लाख दस्त नोंदणीद्वारे 47,000 कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे.
दस्त नोंदणी प्रक्रिया वेगवान होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवस, 100 कलमी कार्यक्रम'अंतर्गत महसूल विभागाला 10,000 कोटी रुपये अतिरिक्त महसूल संकलनाचे उद्दिष्ट दिले आहे. या अंतर्गत 'एक राज्य, एक नोंदणी' हा उपक्रम राबवण्यात येत असून, संबंधित सॉफ्टवेअरच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बदलामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होणार आहे.
advertisement
नवीन प्रणालीमुळे अपेक्षित बदल कोणते?
दस्त नोंदणीसाठी कोणत्याही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातून प्रक्रिया करता येणार
नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळणार
मुद्रांक शुल्क संकलनात वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, नव्या आर्थिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या प्रणालीमुळे दस्तनोंदणी प्रक्रियेत मोठा बदल होईल. स्वतंत्र सॉफ्टवेअरच्या मदतीने कुठल्याही जिल्ह्यातून नोंदणी करणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक लवचिकता मिळेल आणि व्यवहारांची प्रक्रिया जलद होईल. महसूल विभागाने या नव्या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक तयारी सुरू केली आहे.