TRENDING:

कांद्याचे दर स्थिर, तुरीच्या दरात वाढ, सोयाबीन आणि कापसाला काय मिळाला भाव?

Last Updated:

23 जानेवारी रोज शुक्रवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळालं. कपाशी आणि तुरीच्या दरात वाढ नोंदवली गेली असून कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 23 जानेवारी रोजी शुक्रवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळालं. कपाशी आणि तुरीच्या दरात वाढ नोंदवली गेली असून कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, सोयाबीनच्या दरात घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंता दिसून येत आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
advertisement

कपाशीच्या दरात किंचित वाढ

राज्यातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये आज कपाशीची एकूण 7 हजार 29 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यामध्ये वर्धा बाजारात सर्वाधिक 1 हजार 850 क्विंटल कपाशीची आवक झाली. या बाजारात कपाशीला किमान 8 हजार 110 ते कमाल 8 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. गुरुवारी नोंदवलेल्या बाजारभावांच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

advertisement

Mumbai Water Cut News: मुंबई, ठाणेकरांनो लक्ष द्या; सलग 12 दिवस होणार 20 टक्के पाणी कपात, जाणून घ्या

कांद्याचे दर स्थिरच

आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण आवक 2 लाख 59 हजार 50 क्विंटल इतकी झाली. नाशिक बाजारात सर्वाधिक 1 लाख 38 हजार 614 क्विंटल लाल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 512 ते कमाल 1 हजार 549 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दरम्यान, अमरावती बाजारात कांद्याला 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला असून गुरुवारी मिळालेला हा दर आजही कायम आहे.

advertisement

सोयाबीनच्या दरात घट

राज्यातील कृषी बाजारांत आज सोयाबीनची एकूण 38 हजार 732 क्विंटल इतकी आवक झाली. अकोला बाजारात सर्वाधिक 6 हजार 749 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवण्यात आली. या बाजारात सोयाबीनला किमान 5 हजार 115 ते कमाल 5 हजार 380 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला 5 हजार 785 रुपये प्रतिक्विंटल असा उच्च दर मिळाला. मात्र, गुरुवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात घट झाल्याचं दिसून आलं आहे.

advertisement

तुरीच्या दरात वाढ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
म्हणून सायकल घेऊन निघालो, पुण्याच्या सायकल टूरमध्ये एंट्री करणारे आप्पा आले समोर
सर्व पहा

आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 28 हजार 971 क्विंटल इतकी आवक झाली. जालना बाजारात पांढऱ्या तुरीची सर्वाधिक 9 हजार 81 क्विंटल आवक झाली. त्या ठिकाणी तुरीला किमान 6 हजार 730 ते कमाल 7 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर सोलापूर बाजारात आलेल्या काळ्या तुरीला आज 9 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
कांद्याचे दर स्थिर, तुरीच्या दरात वाढ, सोयाबीन आणि कापसाला काय मिळाला भाव?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल