भोपाळमध्ये भव्य लॉन्च कार्यक्रम
हा भव्य लाँचिंग सोहळा भोपाळ येथील ताज लेकफ्रंट हॉटेलमध्ये पार पडला. देशभरातील डीलर्स, कृषी तज्ज्ञ आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कोणते ट्रॅक्टर लॉन्च झाले?
या मध्ये महिंद्रा 475 DI H1R, महिंद्रा 575 DI MS H1R, महिंद्रा 575 DI H1R आणि महिंद्रा 585 DI H1R या चार मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही सर्व मॉडेल्स शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आणि क्षेत्रातील गरजांवर आधारित डिझाइन करण्यात आली आहेत. सुधारित उत्पादकता, कमी देखभाल खर्च आणि जास्त नफा मिळवून देणे, हा या श्रेणीचा मुख्य उद्देश आहे.
advertisement
‘भारताचा पहिला एआय स्पीकिंग ट्रॅक्टर’
या लॉन्चचे विशेष आकर्षण म्हणजे या ट्रॅक्टरना देण्यात आलेले “भारताचे पहिले एआय स्पीकिंग ट्रॅक्टर” असे बिरुद. प्रगत एआय तंत्रज्ञानामुळे हे ट्रॅक्टर ऑपरेशनदरम्यान चालकाला आवश्यक सूचना, माहिती आणि अलर्ट देऊ शकतात. त्यामुळे नवशिक्या शेतकऱ्यांसाठीही ट्रॅक्टर चालवणे अधिक सोपे, सुरक्षित आणि परिणामकारक ठरणार आहे.
प्रत्येक मॉडेलची खास वैशिष्ट्ये
महिंद्रा 475 DI H1R हे मॉडेल उच्च टॉर्क इंजिन आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखले जाते. मजबूत तसेच जास्त वजन उचलण्याची क्षमता आणि इंधन कार्यक्षमता अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे उपयुक्त ठरेल.
महिंद्रा 575 DI MS H1R मध्ये प्रगत हायड्रॉलिक्स आणि स्मूथ स्टीअरिंग सिस्टम देण्यात आली असून, त्यामुळे दीर्घकाळ काम करताना थकवा कमी होतो.
महिंद्रा 575 DI H1R हे जड-ड्युटी कामांसाठी डिझाइन करण्यात आले असून नांगरणी, पेरणी आणि वाहतुकीसारख्या कामांत ते प्रभावी ठरते. महिंद्रा 585 DI H1R हे उच्च एचपी आणि इंधन-कार्यक्षम तंत्रज्ञानासह येते, जे मोठ्या शेतजमिनींसाठी आणि कठीण कामांसाठी योग्य आहे.
