विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेबद्दल देखील माहिती दिली. नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सूरू केली. या योजनेत केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारचे 6000. अशाप्रकारे आज त्याचा हफ्ता आपण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. आजच 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण 1800 कोटी रूपये आपण जमा केलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून दोन्ही योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54 हजार कोटी रूपये आपण जमा केले आहेत,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
advertisement
खात्यात पैसे आल्याचे कसे तपासाल
पहिल्यांदा ही साईट https://nsmny.mahait.org/ तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सूरू करावी.
साईट ओपन होताच लॉगिन आणि Beneficiary Status हे दोन पर्यात दिसतील.
स्टेटस चेक करण्यासाठी Beneficiary Status ऑप्शनवर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होता तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर हे पर्याय दिसतील.
मोबाईल नंबर द्वारे स्टेटस चेक करायचे असल्यास मोबाईल नंबर पर्याय निवडावा.त्यानंतर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड टाकावा आणि गेट डाटा वरती क्लिक केल्यावर तु्म्हाला तुमचं स्टेटस दिसेल.
जर मोबाईलद्वारे स्टेटस पाहण्यात अडचणी येत असतील तर आपण रजिस्ट्रेशन नंबरद्वारे स्टेटस चेक करू शकता. यासाठी मोबाईज ऐवजी रजिस्ट्रेशनचा नंबरचा पर्याय निवडावा लागेल.जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहित नसल्यास Know Your Registration No या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर पर्याय निवडा.
आधार पर्यायामध्ये आपला आधार क्रमांक टाकावा. व कॅप्चा कोड टाकून गेट आधार ओटीपी ऑप्शनवर क्लिक कराले.आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एक सहा अंकी ओटीपी जाईल,तो ओटीपी टाकावा त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक पाहायला मिळेल.
रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून तूम्ही Namo Shatkari Yojana Beneficiary Status पाहू शकता. अशाप्रकारे तुम्हा पैसे जमा झाले आहेत की नाही? हे चेक करता येणार आहे.
