कंटुले ही आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी रानभाजी आहे. या रानभाजीची लागवड 4 बाय 3 वर करण्यात आली आहे. एकूण 20 गुंठ्यांमध्ये 700 ते 800 झाडांची लागवड सुंदर्डे यांनी केली. या शेतीत 50 टक्के कंटुले रानभाजीचे नर काढून टाकावे लागतात. 10 टक्क्यांपर्यंत नर ठेवावे लागतात कारण कंटुल्याच्या 10 मादींच्या झाडांमागे 1 नर रानभाजीचा ठेवणे आवश्यक आहे, नर जास्त असल्यास उत्पन्नाला फटका बसतो.
advertisement
Agriculture News : बोअरमधून मोटार काढणं झालं सोपं, सोलापुरातील अर्जुन यांचे अनोखे जुगाड, Video
कंटुले शेती कशी करावी ?
सर्वप्रथम नांगरट काढून शेतामध्ये रोटा करून, बेड करण्यात यावे. त्यानंतर सिंचन ठिबक अंथरावे, तसेच प्लास्टिकचा वापर करून मल्चिंग करावी. तसेच शेणखत टाकावे, कृषी विभागाने सुचविलेल्या औषधांची फवारणी आणि खताचा वापर करणे, कंटुले या भाजीवर कोणताही रोग येत नाही मात्र धुई येते त्यासाठी कीटकनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे, असे देखील सुंदर्डे यांनी सांगितले आहे.
कंटुलेची शेती भरपूर उत्पन्न देणारी असून मात्र त्यासाठी मेहनत आणि काळजी देखील घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. या पिकाचा साधारणपणे जून ते ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी असतो.