सोलापूर – सध्याच्या काळात शेती क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल होत असून अगदी बी-बियाणे देखील संकरित जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक भाजीपाल्याचे बी-बियाणे लोप पावत असल्याचं चित्र आहे. सोलापुरातील डॉ. संतोष थिटे हे हेच पारंपरिक भाजीपाल्याचे बियाणे जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. परसबाग, किचन गार्डन, होम गार्डन तसेच शेतकरी देखील त्यांच्याकडून बियाणे मोठ्या प्रमाणावर नेत आहे. गुजरात, गोवा, कर्नाटक सारख्या राज्यात त्यांच्या बियाण्यांचे कीट जाऊ लागले आहेत. या बियाणे विक्रीच्या माध्यमातूनते वर्षाला 4 ते 5 लाखांची उलाढाल करत आहे. याबाबत लोकल18 शी बोलताना डॉ. संतोष थिटे यांनी माहिती दिलीये.
advertisement
मोहोळ तालुक्यातील अनगरचे डॉ. संतोष थिटे यांनी वसुंधरा उद्योग समूह सुरू केला आहे. या माध्यमातून ते 100 प्रकारच्या विविध भाज्यांचे जतन, संवर्धन, प्रसार, प्रचार व विक्री करत आहेत. बाजारात उपलब्ध होणारे बियाणे हे संकरित प्रकारचे असते. पण शुध्द देशी बियाणे मिळत नाही. त्यामुळे डॉ. थिटे यांनी केवळ देशी बियाणे देण्याचे ठरवले. त्यानुसार 30 प्रकारच्या भाजीपाल्याच्या बियांचे त्यांनी एक पाकीट तयार केले. या बियांची ते विक्री करत आहेत.
शेतकऱ्याचा फंडा भारी, उसाच्या शेतात घेतलं आंतरपिक, 3 महिन्यात दीड लाख कमाई
राबवली परसबाग कल्पना
डॉ. थिटे यांनी परसबाग ही कल्पना राबवली आहे. या बियांच्या माध्यमातून आपण आपले भाज्या स्वतः बाल्कनीमध्ये, टेरेसवर किंवा एका गुंठ्यांत पिकवू शकतो. तसेच शेतकरी देखील आपल्या शेतात पालेभाज्यांची शेती करण्यासाठी हे बियाणे घेऊन जात आहे. विशेष म्हणजे या बियाण्यावर कोणत्याही प्रकारच्या रासायनीक खतांच्या फवारण्यांची गरज नाही. या विषमुक्त पालेभाज्या खाऊन आपले आरोग्य चांगल्या प्रकारे राखू शकतो, असं डॉ. थिटे सांगतात.
सोशल मीडियाचा वापर
बियांची पाकिटे विकण्यासाठी डॉ. थिटे यांनी सोशल मीडियाचा वापर केला. दिवसेंदिवस भाजीपाल्याच्या देशी वाणांच्या बी-बियाण्याला मागणी वाढली आहे. गुजरात, गोवा, कर्नाटक सारख्या तीन राज्यात त्यांच्या बियाण्यांचे कीट जाऊ लागले आहेत. तसेच बाहेरगावी पोस्टाने पाकिटे पाठवण्यास सुरवात केली. तसेच बंगळूर, सोलापूर, पुणे, हैदराबाद, सूरत अशा भागात या बियाण्याची मागणी वाढत आहे. तर या बियाणे विक्रीच्या माध्यमातुन डॉ. संतोष थिटे हे एका वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. तसचे या व्यवसायातून त्यांनी गावातली 10 ते 15 महिलांना रोजगार देखील दिला आहे.