सोलापूर: भारतात अंडी आणि कोंबडीच्या मांसाची मागणी वाढत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरत आहे. हेच लक्षात घेऊन सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यानं खास कोंबड्यांचं कुक्कुटपालन सुरू केलंय. मोहोळ तालुक्यातील कामती खुर्दचे शेतकरी अरुण शिंदे हे गेल्या 3 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे गिरीराज, नेक्सडनेक आणि फॅन्सी कोंबड्या असून यातून ते वर्षाला 8 ते 10 लाखांची उलाढाल करत आहेत.
advertisement
शेतकरी अरुण शिंदे यांनी प्रोशक्ती ऍग्रो फार्म नावाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. गेल्या 3 वर्षापासुन गिरीराज, नेक्सडनेक आणि फॅन्सी जातीच्या कोंबड्याचं कुक्कुटपालन त्यांनी सुरू केलंय. प्रत्येक तीन महीन्यात गिरीराज, नेक्सडनेक या कोंबड्याची विक्रीसाठी बॅच काढली जाते. अंडी उत्पादनासाठी आणि चिकन विक्रीसाठी या कोंबड्याची बॅच काढली जाते. यातून चांगला नफा देखील मिळत आहे, असं शेतकरी शिंदे सांगतात.
Farmer Success: सगळे नको म्हणत होते, महिला शेतकऱ्यानं डेरिंग केलं, एकरात काढली 45 क्विंटल मका!
फॅन्सी कोंबडीला मागणी
अरुण शिंदे यांच्याकडे शोसाठी असणाऱ्या फॅन्सी कोंबडी देखील आहेत. त्यापासून अंडी देखील मिळतात. पण, या कोंबड्यांचं अंडी देण्याचं प्रमाण कमी आहे. तीन महिन्याच्या आत सर्व कोंबड्या विक्रीसाठी पाठविले जातात. एका जातीच्या हजार पक्षांमध्ये जवळपास दोन ते अडीच लाखांची उलाढाल होते. अरुण शिंदे यांच्या प्रोशक्ती ऍग्रो फार्मच्या एका शेड मध्ये वेगवेगळ्या जातीचे दोन ते अडीच हजार कोंबड्या असून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे बॅचस आहेत.
वर्षाला 10 लाखांपर्यंत उलाढाल
प्रोशक्ती ऍग्रो फार्ममध्ये सुरू केलेल्या गिरीराज, नेक्सडनेक आणि फॅन्सी कोंबडी कुक्कुटपालनातून अरुण शिंदे हे वर्षाला 8 ते 10 लाखांची उलाढाल करत आहेत. कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरत आहे. पोल्ट्री फार्म टाकणे हा कमी भांडवलात मोठी कमाई करण्याचा एक चांगला मार्ग आहे. वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेला रोजगार यामुळे आजकाल तरुण शेतीबरोबरच पशुपालन आणि कुक्कुटपालन सारख्या जोडधंद्यांकडे वळत आहेत. यातून त्यांना चांगला फायदा देखील मिळतोय.