कोकण,घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने घाटमाथा आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि रायगडसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुजरातपासून केरळच्या उत्तर भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे या भागांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवतोय.
मुंबईसह उत्तर कोकणात पावसाचा जोर
मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून अधूनमधून जोरदार सरी येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरून गोव्यापर्यंत पावसाच्या सरींचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
सुधारित पीक विम्याचे नवीन सूत्र काय आहे? नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार?
मराठवाडा आणि विदर्भात दिलासादायक पाऊस
श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणे भरत असून, राज्यातील पाणीटंचाई लवकरच कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेती व्यवस्थापन कसं करायचे?
पीक व्यवस्थापन – सोयाबीन, ऊस, ज्वारी, बाजरी, हळद
पिकात पाणी साचू नये, यासाठी निचरा होईल याची दक्षता घ्या. वापसा असताना तण नियंत्रण व अंतरमशागती करावी.
अळ्या व घाटेअळी नियंत्रणासाठी काय करावे?
प्रोफेनोफॉस 50% EC–20 मि./10 लि. पाणी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.9% –6 मि./10 लि. पाणी याचा वापर करावा याने अळीवर नियंत्रण येईल.
सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसल्यास काय करावे?
मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 – 50 मि./10 लि. पाणी फवारावे. पांढऱ्या माशीवर नियंत्रणासाठी 10 पिवळे चिकट सापळे प्रति एकर लावावेत.
फळबाग व्यवस्थापन (मोसंबी, संत्रा, डाळिंब, चिकू)
अतिरिक्त पाणी थांबू देऊ नका.
वापसा पाहून अंतरमशागती व तण नियंत्रण करा.
कीटकनाशक फवारणीसाठी उघडिपाची वाट पाहा.
डाळिंब बागेत अनावश्यक फुटवे काढावेत.
भाजीपाला व फुलशेती
भेंडी, कारले, दोडका यांची वापसा असताना लागवड करा. तसेच वांगी, मिरची, टोमॅटो रोपांना 45 दिवस झाल्यास पुनर्लागवड करा.
महत्वाची सूचना
तसेच पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे कोणतीही फवारणी किंवा खतमात्रा देण्याचे काम पुढे ढकला. पाऊस थांबल्यावर आणि वापसा झाल्यावरच शेतीची कामे करा.
हवामानाचा नियमित अंदाज घ्या आणि योग्य ती खबरदारी घ्या.
