TRENDING:

कृषी हवामान : पावसाचा खरीप पिकांना धोका, नुकसान टाळण्यासाठी IMD कडून मोलाचा सल्ला

Last Updated:

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात 27 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्रात 27 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कृषी हवामान केंद्रांकडून विविध भागांतील शेतकऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
maharashtra weather update
maharashtra weather update
advertisement

कोकण

शेतकऱ्यांनी भात, नाचणी, हळद, भुईमूग व फळपिके (नारळ, काजू, सुपारी, आंबा) यांतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसेच रायगड व पालघर जिल्ह्यांत प्रतिकूल हवामान असल्याने भाताची लागवड पुढे ढकलावी. खतांचा वापर व रासायनिक फवारणी पुढे ढकलाव्यात.

मध्य महाराष्ट्र

पुणे, नाशिक, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील घाट भागात भात पिकांतून पाणी काढण्याची योग्य व्यवस्था करावी. पुणे व नाशिकमध्ये भाताची पुनर्लागवड उघडीप पाहून करावी. सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर मुग, उडीद, बाजरी, सोयाबीन पिकात आंतरमशागत करावी.

advertisement

मराठवाडा

सोयाबीन, बाजरी, हळद, ऊस, भाजीपाला व फळपिकांतून पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. रासायनिक फवारणी आणि खतांचा वापर सध्या टाळावा.

पूर्व विदर्भ

भात, फळबागा व भाजीपाला रोपवाटिकांतून अतिरिक्त पाणी बाहेर काढावे. भात रोपे, तूर, सोयाबीन व कापूस पिकात पुनर्लागवड, आंतरमशागत, खत व फवारणी पुढे ढकलावी.

पश्चिम विदर्भ

सोयाबीन, ज्वारी, मका, उडीद, तूर, मूग पिकांमध्ये वापसा स्थितीत आंतरमशागत करावी. तसेच नवीन लागवड केलेल्या फळबागांना काठीचा आधार द्यावा. वादळी वाऱ्यांपासून संरक्षणासाठी जनावरांना गोठ्यात ठेवावे.

advertisement

मशागतीसाठी सल्ला

अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी

भुईमुगात हुमणी अळी नियंत्रणासाठी मेटार्हिझियम अ‍ॅनिसोप्लिया @50 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळिंब बागांतील रस शोषक किडींसाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथोक्समची फवारणी उघडीप पाहून करावी.

कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी

भात, नाचणी पिकांतील अतिरिक्त पाणी बाहेर काढावे. भाजीपाला व फळबागांना काठीचा आधार द्यावा. मका, सोयाबीन, भुईमूग पिकांमध्ये आंतरमशागत करावी. आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागत व रानबांधणी चालू ठेवावी.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

दरम्यान, सध्याचे हवामान अनिश्चित असल्याने कोणतेही कृषी निर्णय घेताना हवामान विभाग व कृषी वैज्ञानिकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : पावसाचा खरीप पिकांना धोका, नुकसान टाळण्यासाठी IMD कडून मोलाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल