जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चितोडा या छोट्याशा गावातील त्र्यंबक डिगे हे मागील अनेक वर्षांपासून आपली पारंपरिक शेती करत आहेत. परंतु मागील काही वर्षांत त्यांना शेड नेट शेतीचा छंद जडलाय. या शेतीत ते शिमला मिरची, दोडका यांसारखी पिके घेतात. त्यांच्या 15 एकर पारंपरिक पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही अधिक उत्पन्न त्यांना केवळ एक एकरात केलेल्या शेड नेट शेतीतून मिळते.
advertisement
नोकरी सोडली अन् कलेलाच फोकस केलं, 22 वर्षांच्या प्रणालीची लाखात कमाई, करते काय?
मागील चार वर्षांपासून ते शेड नेटमध्ये दोडका पीक घेत आहेत. या पिकावर पाच महिन्यांत 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आश्चर्यकारक उत्पादन देखील मिळते. केवळ 20 गुंठ्यांत ते 150 ते 200 क्विंटल दोडका उत्पादन करतात. या दोडक्याला शेतावरच 35 ते 50 रुपये किलो दर मिळतो. खर्च वजा केल्यास त्यांना या पिकातून तब्बल 5 लाख नफा केवळ 5 महिन्यांत मिळतो.
शेती ही उद्योग म्हणून केल्यास नक्कीच फायदा होतो. पारंपरिक पिके कमी करून शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग करावेत, असं आवाहन डिगे नवीन शेतकऱ्यांना करतात.





