सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवन आनंद ही संस्था निराधारासाठी एक देवदूत म्हणून कार्य करते. रस्त्यावरील निराधारांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम जीवन आनंद ही संस्था करते. सध्या या संस्थेच्या सविता आश्रमात 175 नीराधार बांधव राहतात. आश्रमात राहणाऱ्या आणि सुस्थितीतीत असलेल्या काही निराधार बांधवानी एक वेगळी किमया या आश्रमाच्या जागेत केली आहे. आश्रमाच्या 70 गुंठे जागेत भाजीपाला शेती, पोल्ट्री अशी विविध प्रकारची शेती फुलवली आहे. या संस्थेचे महाबळेश्वर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेती निराधार बांधवानी फुलवली आहे.
advertisement
या शेतीबद्दल सांगताना या संस्थेचे महाबळेश्वर कामत सांगतात, की पणदूर येथे आपल्या संस्थेच्या सविता आश्रमा 175 निराधार बांधव आहेत. त्यातील काही बांधव हे शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत. त्यांना आश्रमात बसून राहण्यापेक्षा काम करण्याची इच्छा होती. म्हणून यावर विचार करून त्यांना कोणता रोजगार द्यावा हा विचार करत असताना असा विचार मनात आला की संस्थेची किनळोस येथे जागा आहे.
निराधारासाठी कुडाळ येथील सविता आश्रम ठरतोय एक आधार, दीड हजार नागरिकांचे यशस्वीरित्या पुनर्वसन
त्या जागेत काही तरी रोजगार निर्माण करावा या उद्धेशाने संस्थेच्या जागेत भाजीपाला शेती कारवी असे सुचले. त्यानुसार त्या जागेत काही निराधार बांधवाना घेऊन त्या जागेत कोबी, दोडकी, काकडी पडवळ अशा सर्वच प्रकारच्या भाज्यांची शेती केली आणि त्यास जोड धंदा म्हणुन कावेरी जातीच्या कोंबड्यांच पालन केले. गीर गाई, घोडे, बदक याही प्राण्यांचे पालन केले. यातून काही महिन्यातच उत्पन्नात सुरुवात झाली.
आश्रमासाठी लागणाऱ्या भाजी पाला, अंडी, दूध या वस्तू आश्रमाच्या जागेत पिकवू लागलो. दररोज 150 अंडी कोंबड्यापासून मिळतात. आश्रमाची महिन्याची अंड्याची गरज ही 1200 आहे. उर्वरित अंडी ही बाजारात विकतो. भाजीपाल्याच देखील तसंच केल जात. आश्रमाची गरज भागवून उर्वरित भाजीपाला हा विक्री केला जातो. यातून एकवर्षाकाठी आश्रमाची गरज भागवून 5-6 लाखांचा भाजीपाला विकला जातो. यातून एक आर्थिक फायदा मिळतो. तसेच या बांधवाना देखील एक आनंद आणि समाधान मिळत असल्याच ते सांगतात.