महिला दिनाचे औचित्य साधून उपजिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी अमोल भोसले यांनी संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांचे कागदपत्र पूर्ण करून घेतले. तसेच बँकांशी समन्वय साधत खात्यांशी संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करण्याची कार्यवाही केली.
10 गावांतील 15 महिलांना 5 कोटी 15 लाख रुपयांचे अनुदान
सोलापूर शहर आणि परिसरातील 10 गावांतील 15 महिला शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला देण्यात येणार आहे. एकूण 6 कोटी 15 लाख रुपयांचे धनादेश वितरित केले जाणार आहेत.
advertisement
महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
राज्य शासनाने 100 दिवसांचा विशेष आराखडा जाहीर करत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले होते. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील गावांतील महिला शेतकऱ्यांना केवळ 30 दिवसांत मोबदला मिळणार आहे.
महिलांसाठी प्रक्रियेत सुलभता
भूसंपादनाची प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीची असते. विशेषतः महिला शेतकऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याबाबत तांत्रिक माहिती कमी असते. काही लाभार्थी महिला सध्या परगावी असल्याने त्यांचा प्रस्ताव प्रक्रियेत अडथळे येत होते. त्यामुळे प्रशासनाने थेट महिलांशी संपर्क साधून ही प्रक्रिया सुलभ केली.