मेष
मेष राशीसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, तसेच जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान लाभेल. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. छोट्या गोष्टींवरून वाद टाळणे श्रेयस्कर ठरेल.
वृषभ
वृषभ राशीसाठी हा आठवडा मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. नवीन संधी मिळतील परंतु त्यासोबत आव्हानेही असतील. परिश्रमाचे योग्य फळ मिळेल पण घाईगडबड टाळावी. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील लहानसहान गोष्टींवर वाद घालणे टाळा. प्रवास करताना विशेष काळजी घ्या.
advertisement
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि प्रयत्नांना महत्त्व दिले जाईल. यामुळे कार्यक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला आहे. प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन संपर्कातून लाभ होऊ शकतो.
कर्क
कर्क राशीसाठी या आठवड्यात नवीन योजना आखण्यास आणि सुरू करण्यास उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल पण पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि प्रवासाची शक्यता आहे, जो लाभदायक ठरेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेष ठरणार आहे. व्यक्तिमत्व प्रभावी राहील आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात नवे करार होऊ शकतात. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत असेल पण चैनीसाठी जास्त खर्च होऊ शकतो. कोणावरही अति विश्वास ठेवणे टाळावे.
कन्या
कन्या राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असेल. नशीब तुमच्या बाजूने राहील आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या येतील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि कामाच्या पद्धतीचा प्रभाव इतरांवर पडेल.
एकूणच, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मेष ते कन्या राशीपर्यंतच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि कौटुंबिक समाधान अपेक्षित आहे. मात्र अनावश्यक खर्च आणि वाद टाळणे गरजेचे आहे.
(सदर बातमी फक्त माहितीकरीता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)