TRENDING:

Today Horoscope : आज प्रभू श्रीरामाची ७ राशींवर कृपा होणार! संकट टळणार, नशीब उजाडणार, पैसा सुखशांती मिळणार

Last Updated:

RamNavami 2026 : वैदिक पंचांगानुसार आज, २६ मार्च २०२६ गुरुवार असून पवित्र राम नवमी साजरी केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज २६ मार्च २०२६ गुरुवार असून पवित्र राम नवमी साजरी केली जात आहे. धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून आजचा दिवस विशेष मानला जात असून, ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे एक दुर्मीळ योग निर्माण झाला आहे. या योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर जाणवणार असून काहींसाठी लाभदायक तर काहींसाठी सावधगिरीचा इशारा देणारा ठरू शकतो. श्रीरामांच्या कृपेने तुमचा दिवस कसा जाईल? जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
ramnavami 2026
ramnavami 2026
advertisement

मेष

आज मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर चटकन राग येऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

वृषभ

आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. यामुळे मानसिक समाधान लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल.

मिथुन

घरगुती चर्चांमधून सकारात्मक निष्कर्ष निघतील. तुमचे विचार कुटुंबासाठी फायदेशीर ठरतील.

कर्क

महिलांना मनासारखी कामे करण्यात अडथळे येऊ शकतात. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रांची पूर्तता काळजीपूर्वक करा.

advertisement

सिंह

अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रयत्न असूनही अपेक्षित परिणाम मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.

कन्या

तुमच्यात क्षमता असूनही योग्य संधी न मिळाल्याने निराशा येऊ शकते. मेहनत सुरू ठेवा, योग्य वेळ येईल.

तूळ

व्यवसायात अडथळे आणि विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. मात्र संयम ठेवल्यास शेवटी स्थैर्य मिळेल.

advertisement

वृश्चिक

राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना संधी मिळू शकते. नोकरीत मेहनतीचे फळ वरिष्ठांकडून मिळेल.

धनु

जुन्या विचारांच्या लोकांशी संवाद होईल. त्यामुळे नवीन किंवा आधुनिक कल्पनांना फारसा वाव मिळणार नाही.

मकर

महिलांच्या काटकसरी स्वभावाची दखल घेतली जाईल. स्वामित्वाची भावना असूनही भावनिक बाजू प्रबळ राहील.

कुंभ

कामाच्या ठिकाणी संघर्ष आणि विरोध वाढू शकतो. छोट्या कारणांवरून चिडचिड होण्याची शक्यता आहे.

advertisement

मीन

हट्टीपणा आणि अहंकार वाढण्याची शक्यता आहे. इतरांचा विचार न केल्यास स्वतःचे नुकसान होऊ शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Today Horoscope : आज प्रभू श्रीरामाची ७ राशींवर कृपा होणार! संकट टळणार, नशीब उजाडणार, पैसा सुखशांती मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल