advertisement

APMC Market: लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?

Last Updated:

वाढत्या उन्हासह बाजारातील लिंबूची मागणी देखील वाढते आहे. लिंबूच्या आवकेत आज सुधारणा दिसून आली.

+
News18

News18

सांगली: आज 25 मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2 लाख 56 हजार 188 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला नाशिक मार्केटमध्ये 1096 रुपये, सोलापूर मार्केटमध्ये 700 रुपये तर अमरावती मार्केटमध्ये 1350 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. कालच्या तुलनेत आजच्या भावात प्रतिक्विंटलमागे दीडशे रुपये सुधारणा दिसून आली. तसेच उन्हाळी कांद्याला अहिल्यानगर मार्केटमध्ये 863 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला.
लिंबूची आवक
वाढत्या उन्हासह बाजारातील लिंबूची मागणी देखील वाढते आहे. लिंबूच्या आवकेत आज सुधारणा दिसून आली. राज्याच्या मार्केटमध्ये आज 796 क्विंटल आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 395 क्विंटल लिंबूला 3000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबूला 12750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्ष आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढलेली दिसली. आज 1362 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 690 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 12000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सांगली बाजारात आवक झालेल्या 35 क्विंटल द्राक्षास 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्यामध्ये केळीचे मार्केट पुरतेच गडगडले दिसते. केळी निर्यात बंद असल्याचे कारण पुढे करत केळी उत्पादकांची फरपट होताना दिसते. आज केवळ 214 क्विंटल केळीची आवक झाली. मुंबई बाजारात आवक झालेल्या 120 क्विंटल केळीला प्रतीनुसार 350 ते 4500 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement