Kidney Health : सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येतेय? लघवीचा रंग बदललाय? किडनी निकामी होण्याची 'ही' 5 सुरुवातीची लक्षणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
धक्कादायक बाब अशी की, किडनीचे आजार सुरुवातीला सहजासहजी लक्षात येत नाहीत. जेव्हा हे आजार गंभीर रूप धारण करतात, तेव्हाच त्यांची लक्षणं दिसू लागतात.
आपण आपल्या शरीराच्या बाह्य सौंदर्याची जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी शरीराच्या आत रात्रंदिवस काम करणाऱ्या अवयवांची घेतो का? विचार करा, आपल्या शरीरातील एक वॉटर प्युरिफायर जो 24 तास रक्तातील अशुद्धी बाहेर काढण्याचं काम करतो. तो म्हणजे आपली किडनी. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकणं आणि रक्त शुद्ध ठेवणं ही किडनीची मुख्य जबाबदारी आहे. पण, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या आहारामुळे या महत्त्वाच्या अवयवावर प्रचंड ताण येत आहे.
advertisement
धक्कादायक बाब अशी की, किडनीचे आजार सुरुवातीला सहजासहजी लक्षात येत नाहीत. जेव्हा हे आजार गंभीर रूप धारण करतात, तेव्हाच त्यांची लक्षणं दिसू लागतात. मात्र, आपलं शरीर काही छोट्या संकेतांद्वारे आपल्याला आधीच सावध करत असतं. प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टर कुणाल सूद यांनी किडनीच्या आजारांच्या अशाच काही सुरुवातीच्या लक्षणांबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. ही लक्षणं वेळीच ओळखली, तर आपण मोठ्या संकटातून वाचू शकतो.
advertisement
advertisement
लघवीमध्ये फेस येणेलघवी करताना जर त्यावर साचलेल्या फेसासारखा थर दिसत असेल, तर सावधान! याचा अर्थ असा की तुमच्या किडनीचे फिल्टर नीट काम करत नाहीत. जेव्हा किडनी खराब होते, तेव्हा रक्तातील महत्त्वाचं प्रथिन लघवीवाटे बाहेर पडू लागतं, ज्यामुळे फेस तयार होतो. असं वारंवार होत असल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे.
advertisement
advertisement
भूक न लागणे आणि सतत थकवाकिडनी नीट काम करत नसेल तर रक्तातील विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. यामुळे जेवणाची इच्छा मरते आणि सतत मळमळल्यासारखं वाटतं. तसेच, किडनी खराब झाल्यामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होते आणि ॲनिमियाचा धोका वाढतो. यामुळेच किडनीच्या ७० टक्के रुग्णांना काहीही काम न करता प्रचंड थकवा जाणवतो, असं डॉ. कुणाल सूद सांगतात.
advertisement
घोटा आणि पावलांवर सूजजेव्हा किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते पाणी गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या खालच्या भागात जमा होतं. यालाच वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. यासोबतच रात्री वारंवार लघवीला होणं, स्नायूंमध्ये पेटके येणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं ही देखील किडनीशी संबंधित लक्षणं असू शकतात.
advertisement
किडनी हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. वरीलपैकी कोणतंही लक्षण जर तुम्हाला जाणवत असेल, तर ते घरगुती उपायांनी दाबून टाकण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. भरपूर पाणी पिणे, मिठाचं प्रमाण मर्यादित ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे, हे तुमच्या किडनीला दीर्घायुष्य देण्याचे साधे पण प्रभावी मार्ग आहेत. लक्षात ठेवा, योग्य वेळी केलेली तपासणी तुमचं आयुष्य वाचवू शकते.
advertisement







