advertisement

Health Tip : सकाळची सुरुवात मुख दुर्गंधीनं होते का ? जाणून घ्या असं का होतं ? शरीर देत असतं काही संकेत

Last Updated:

आपलं तोंड म्हणजे आपल्या शरीराचा आरसा. रात्रीच्या वेळी आपल्या शरीरानं पाणी, श्वासोच्छ्वास आणि पचनक्रिया कशी हाताळली हे सकाळच्या श्वासातून जाणवतं. सकाळी येणारा दुर्गंध हे केवळ रात्रीच्या अपुऱ्या झोपेचा परिणाम नाही तर आपल्या शरीरात काहीतरी घडत असल्याचं ते एक लक्षण देखील असू शकतं.

News18
News18
मुंबई : सकाळची सुरुवात दात घासण्यानं होते. पण त्याआधीच तुम्हाला सकाळी उठल्यावर तोंड कोरडं वाटत असेल आणि दुर्गंधीयुक्त असल्याचं आढळलं, तर त्याची कारणं समजून घेऊया.
आपलं तोंड म्हणजे आपल्या शरीराचा आरसा. रात्रीच्या वेळी आपल्या शरीरानं पाणी, श्वासोच्छ्वास आणि पचनक्रिया कशी हाताळली हे सकाळच्या श्वासातून जाणवतं. सकाळी येणारा दुर्गंध हे केवळ रात्रीच्या अपुऱ्या झोपेचा परिणाम नाही तर आपल्या शरीरात काहीतरी घडत असल्याचं ते एक लक्षण देखील असू शकतं.
सकाळी तोंड कोरडं पडणं किंवा तोंडाला दुर्गंधी येणं हे डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातल्या पाण्याच्या कमतरतेमुळेही होऊ शकतं. अपुरी झोप किंवा चयापचयाच्या समस्यांचं ते लक्षण असू शकतं. आपण झोपतो तेव्हा लाळेची निर्मिती कमी होते.
advertisement
ही लाळ आपले तोंड स्वच्छ ठेवण्यास, जीवाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी मदत करते. लाळेचं प्रमाण कमी झाल्यामुळे, जीवाणूंची झपाट्यानं वाढ होते, ज्यामुळे सकाळी दुर्गंधी अधिक तीव्रतेनं येते.
advertisement
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर, शरीर महत्त्वाच्या अवयवांना प्राधान्य देतं आणि लाळेचं उत्पादन कमी करतं. एसीमधे झोपल्यानं किंवा रात्री कॅफीन किंवा अल्कोहोल सेवन केल्यानं ही समस्या वाढू शकते. याचं आणखी एक कारण म्हणजे तोंडानं श्वास घेणं. अनेक लोक नाक चोंदल्यामुळे, ॲलर्जीमुळे किंवा सवयीमुळे तोंडानं श्वास घेतात, ज्यामुळे तोंड कोरडं पडतं आणि जीवाणूंची वाढ होते. हे अपुऱ्या झोपेचं लक्षण देखील असू शकतं, कारण तोंडानं श्वास घेणं हे अनेकदा घोरणं आणि झोपेतील व्यत्ययाशी संबंधित असतं.
advertisement
झोपेची गुणवत्ता देखील आरोग्यासाठी महत्त्वाची असते. झोपेत वारंवार व्यत्यय आल्यानं मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे लाळेचं उत्पादन कमी होतं.
म्हणूनच, ज्यांना चांगली झोप लागत नाही, त्यांना सकाळी ही समस्या जाणवण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी, तोंडाच्या दुर्गंधीचं कारण पचनाशी देखील संबंधित असतं.
advertisement
तणाव आणि काही विशिष्ट औषधांमुळेही ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तणावामुळे श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल होतो आणि लाळेचं उत्पादन कमी होतं. अँटीहिस्टामाइन किंवा रक्तदाबाच्या औषधांसारख्या काही विशिष्ट औषधांमुळे देखील तोंड कोरडं पडू शकतं.
अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tip : सकाळची सुरुवात मुख दुर्गंधीनं होते का ? जाणून घ्या असं का होतं ? शरीर देत असतं काही संकेत
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement