Health Tips : हवामान बदलाचे होतात प्रकृतीवर परिणाम, साध्या उपायांनी करता येईल मात
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बदलत्या हवामानामुळे, नाक, घसा आणि फुफ्फुसांचं संक्रमण तसेच ॲलर्जीसारख्या समस्या जाणवतात. या ऋतूत काहींना अनेकदा कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. कोरडा खोकला सहसा विषाणूजन्य संसर्ग, ॲलर्जी किंवा घसादुखीमुळे होतो. काही सोप्या गोष्टी आणि योग्य दिनचर्येमुळे हा त्रास सहजपणे कमी करता येतो.
मुंबई : उन्हाळा सुरु असला तरी दिवसभरात हवामानात बदल होताना दिसतायत. दिवसा उष्णता आणि रात्री थंड वारे. दिवसातल्या या बदलांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
बदलत्या हवामानामुळे, नाक, घसा आणि फुफ्फुसांचं संक्रमण तसेच ॲलर्जीसारख्या समस्या जाणवतात. या ऋतूत काहींना अनेकदा कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. कोरडा खोकला सहसा विषाणूजन्य संसर्ग, ॲलर्जी किंवा घसादुखीमुळे होतो. काही सोप्या गोष्टी आणि योग्य दिनचर्येमुळे हा त्रास सहजपणे कमी करता येतो.
बदलत्या हवामानात कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी हे उपाय करुन पाहता येतील.
advertisement
कोमट पाणी - घसादुखी आणि कोरड्या खोकल्यावर कोमट पाणी पिणं हा सर्वात सोपा उपाय आहे. कोमट पाण्यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि कफ पातळ होऊन खोकला नियंत्रणात येतो. थोडे मीठ घालून गुळण्या केल्याने घशातील अंतर्गत जळजळ त्वरित शांत होऊ शकते.
advertisement
मध: आयुर्वेदात मधाला महत्त्व आहे. यामुळे खोकला कमी होतो तसंच, घशाभोवती एक संरक्षक थर देखील तयार होतो. विज्ञानानुसार, मधामधे नैसर्गिक जीवाणूनाशक आणि दाहशामक गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाऊ शकता किंवा कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. यामुळे रात्रभर होणारा खोकला कमी होण्यास आणि गाढ झोप लागण्यास मदत होऊ शकते.
advertisement
वाफ: वाफ घेण्याला आयुर्वेदात याला 'श्वसन सुधारक' म्हटलं जातं. वाफेमुळे घशातील आणि श्वसनमार्गातील जळजळ शांत होते, कफ पातळ होतो आणि श्वास घेणं सोपं होतं. एका पातेल्यात पाणी उकळून हळूहळू वाफ आत घेण्याचा प्रयत्न करू शकता. त्यात तुळशीच्या किंवा पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाका, ज्यामुळे घसा आणि नाक दोन्ही स्वच्छ होतात आणि सर्दी-खोकल्याचा धोका कमी होतो.
advertisement
प्रदूषण प्रतिबंध: धूळ, धूर आणि प्रदूषण टाळणं देखील महत्त्वाचं आहे. खोकताना, धूम्रपान करणं किंवा धुराच्या ठिकाणी जाणं टाळा. प्रदूषण आणि धूळ घशाला अधिक त्रास देतात आणि खोकला वाढवतात. हवा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य वायुवीजन आणि सौम्य आर्द्रता राखा.
advertisement
तळलेले पदार्थ खाणं टाळा: आहार आणि दैनंदिन दिनचर्या महत्त्वपूर्ण आहेत. जास्त तळलेले, खूप थंड किंवा खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं खोकला वाढू शकतो. त्याऐवजी, हलके, पौष्टिक आणि गरम पदार्थ खा.
आलं, काळी मिरी, हळद आणि तुळस यांसारख्या औषधी वनस्पती घसादुखी आणि खोकला कमी करण्यासाठी मदत करतात. रात्री हळदीचं दूध किंवा आल्याचा चहा प्यायल्यानं खोकला लवकर शमण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 7:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : हवामान बदलाचे होतात प्रकृतीवर परिणाम, साध्या उपायांनी करता येईल मात








