advertisement

पहिल्याच फिल्ममध्ये लीड हिरोईनला पटवलं! कशी सुरू झाली आदित्य-यामीची लव्हस्टोरी? एका गोष्टीमुळे प्रेमात पडली अभिनेत्री

Last Updated:
Aditya Dhar-Yami Gautam Love Story: देशभक्तीपर चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेले आदित्य यांची लव्हस्टोरी एखाद्या रोमँटिक फिल्मला लाजवेल अशी आहे. २०२१ साली त्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसोबत लग्न केले.
1/9
धुरंधर या फिल्मने बॉक्स ऑफिसचा धूर काढला आहे. आजवर कोणत्याही बॉलिवूड फिल्मला जमलं नाही, ती कामगिरी धुरंधरने करून दाखवली आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींहून अधिकचा गल्ला केला, त्यातच आता या फिल्मचा दुसरा भाग रिलीज झाला असून त्याने अवघ्या आठवड्याभरात १००० कोटींच्या क्लबकडे कूच केले आहे.

2/9
या चित्रपटाची कथा, त्यातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्वांचेच सध्या खूप कौतुक होतं असलं, तरीही या यशामागे सर्वांत मोठा वाटा आहे तो म्हणजे धुरंधरचे दिग्दर्शक आदित्य धर यांचा. आजवर त्यांनी केवळ तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले असले, तरीही त्यांचे तिन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

3/9
देशभक्तीपर चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेले आदित्य यांची लव्हस्टोरी एखाद्या रोमँटिक फिल्मला लाजवेल अशी आहे. २०२१ साली त्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसोबत लग्न केले. नुकतेच एका मुलाखतीत यामी गौतमने तिची प्रेमकहाणी सर्वांसोबत शेअर केली आहे.

4/9
यामी गौतमने आदित्य धर यांची पहिली फिल्म 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेकांना वाटले की या फिल्मच्या सेटवरच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. पण यामीने एका मुलाखतीत खुलासा केला की, या फिल्मच्या दरम्यान त्यांनी फक्त कामापुरता संवाद साधला. मात्र फिल्मच्या प्रमोशनच्या दिवसांमध्ये त्यांच्यात खऱ्या गप्पा सुरू झाल्या.

5/9
यामीने सांगितले की,
यामीने सांगितले की, "फिल्मच्या प्रमोशनच्या वेळी आमचे बोलणे सुरू झाले. ना त्याने मला प्रपोज केले, ना मी त्याला. आम्हाला फक्त इतके माहीत होते की आम्हाला लग्न करायचे आहे. आमची कुटुंबेही एकमेकांशी इतकी जोडली गेली होती की सर्वांनी आनंदाने या नात्याला होकार दिला."
advertisement
6/9
इतकेच नाही, तर यामीने यावेळी आदित्य यांनाच जोडीदार म्हणून का निवडले याचेही उत्तर दिले आहे. तिने आदित्य यांच्या एका खास गुणाचा उल्लेख केला, ज्यामुळे यामी त्यांच्या प्रेमात पडली. यामीने सांगितले की आदित्य अतिशय शांत स्वभावाचे आहेत. कितीही कठीण परिस्थिती असली, तरीही ते आपला संयम सोडत नाहीत.

7/9
तिने त्यांच्या कामाचेही कौतुक केले. यामीने आदित्य यांना 'उरी'च्या सेटवर दिग्दर्शन करताना पाहिले, तेव्हा त्यांची कामासाठी असलेली पॅशन पाहून तिच्या मनातील त्यांचा आदर आणखीनच वाढला. यामीने आदित्य यांचा एक किस्सा सांगताना त्यांच्यातील माणुसकीचेही कौतुक केले.

8/9
यामीने सांगितले की, एकदा फिल्मच्या सेटवर यामीची मेकअप आर्टिस्ट जमिनीवर बसून जेवत होती. तिला असं जेवताना पाहून आदित्य यांनी लगेच त्यांची खुर्ची तिला दिली. या छोट्याशा पण मोठ्या मनाच्या कृतीने यामीचे मन जिंकले होते.

9/9
'उरी' च्या रिलीज नंतर तब्बल दोन वर्षे त्यांनी आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. अखेर जून २०२१ मध्ये हिमाचल प्रदेशात अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करून त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. २०२४ साली यामीने तिचा मुलगा वेदाविदला जन्म दिला. आता हे कुटुंब आनंदाने संसार करत असून हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement