IPL 2026 : अर्जुनला बोलताना तोंडातून घाणच बाहेर पडते, स्टार खेळाडूवर ज्युनिअर तेंडुलकरचे गुरू संतापले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने अर्जुन तेंडुलकरला खेळायलाच मिळणार नाही, असे मोठं विधान केलं आहे.या विधानानंतर अर्जुनचे कोच भडकले असून त्यांनी कठोर शब्दात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला सुनावलं आहे.
Arjun Tendulkar News : आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्चपासून सूरूवात होणार आहे. या हंगामात सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदा लखनऊ सुपर जाएटस संघातून खेळणार आहे. यासाठी तो मैदानात कसून सराव करताना दिसला आहे.असे असताना टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने अर्जुन तेंडुलकरला खेळायलाच मिळणार नाही, असे मोठं विधान केलं आहे.या विधानानंतर अर्जुनचे कोच भडकले असून त्यांनी कठोर शब्दात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला सुनावलं आहे.
खरं तर आयपीएलआधी अनेक चॅनेल्सवर डिबेट सूरू आहेत. या डिबेटमध्ये प्रत्येक संघाची ताकद किती आहे? कुठलीही बाजू कमकुवत आहे? कुठल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल? अशा सगळ्या गोष्टीवर चर्चा होत असते. या चर्चे दरम्यान लखनऊ सुपर जाएटसच्या टीम कॉम्बिनेशनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर खेळणारच नाही.त्यामुळे त्याबद्दल बोलूच नका. मला वाटतं हे खूप अवघड आहे.कारण या संघात मयंक यादव, मोहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी सारखे वेगवान गोलंदाज आहेत. अशात तो कसा खेळणार? जोपर्यंत लखनऊचे काही बॉलर जखमी होत नाही , तो पर्यंत त्याला संघात खेळायची संधी मिळणार नाही, असे टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन म्हणाला आहे.
advertisement
आर. अश्विनने अर्जुन तेंडुलकर बाबत केलेल्या या विधानानंतर त्याचे कोच युवराज सिंगचे वडील योगराज सिंह भडकले आहेत. हा आर अश्विन बकवास करतो आहे. एखाद्याबद्दल काय बोलायचं हे त्याला कळायला हवं. कोणीतरी टेलिव्हिजनवर बसुन सांगतंय,अरे, तो हे करू शकत नाही,अशा शब्दात योगराज यांनी पहिल्यांदा संताप व्यक्त केला.तसेच तुम्ही कोण आहात? तुम्ही काय आहात? असा सवाल देखील योगराज यांनी केला होता.
advertisement
तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे ही एक वेगळी स्टोरी आहे. पण जेव्हा तो माझ्याकडे होता. तेव्हा मी युवीला म्हणालो होतो, तुम्ही सगळे अर्जुन तेंडुलकरला चुकीच्या पद्धतीने लक्ष केंद्रीत करत आहात.तो गोलंदाज नाही, त्याला पाठीच्या कणाचा त्रास होता आणि त्याचे हात 45 अंशातून खाली येतात. तो इथे असताना मी त्याच्याशी बोलत होते. तो गोवा संघात असताना मी त्याच्या प्रशिक्षकालाही हे सांगितले होते.
advertisement
जर तुम्हाला जमत नसेल तर त्याला माझ्याकडे पाठवा, मी संपूर्ण जगाला आव्हान देतो की, जर अर्जुन तेंडुलकरने माझ्यासोबत सहा महिने घालवले तर तो या जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकेल, नाहीतर मी माझी दाढी कापून फेकून देईन,असे योगराज म्हणाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 6:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : अर्जुनला बोलताना तोंडातून घाणच बाहेर पडते, स्टार खेळाडूवर ज्युनिअर तेंडुलकरचे गुरू संतापले









