advertisement

RamNavami 2026: श्रीरामाच्या जन्माआधी काय झालं होतं? राजा दशरथाचा यज्ञ; रामनवमीनिमित्त दिव्य अवताराची कहाणी

Last Updated:
RamNavami 2026: गुरुवारी श्रीरामनवमीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येसह देश-महाराष्ट्रातील राम मंदिरांमध्ये पूजा-विधींची तयारी केली जात आहे. श्रीरामांचा जन्म कसा झाला, त्यावेळी अयोध्येत नेमकं काय झालं, याविषयी रामनवमीनिमित्त आपण जाणून घेऊ. रामायणानुसार, श्री रामांचा जन्म एका दैवी योजनेचा भाग होता. राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, ज्यानंतर त्यांच्या राण्यांना दिव्य खीर मिळाली. त्यातूनच श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. रामांचा जन्म धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी झाला होता. रामायण आजही आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.
1/7
रामायण ही एक साधी-सुधी गोष्ट नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि जीवनाची मूल्ये समजावून सांगणारा एक महान ग्रंथ आहे. यामध्ये प्रभु रामांच्या जन्माची कथा अतिशय खास मानली जाते. श्रीरामांचा जन्म म्हणजे पृथ्वीवर धर्माच्या स्थापनेसाठी भगवान विष्णूंच्या अवताराची सुरुवात होती. त्याकाळी पृथ्वीवर अधर्म वाढला होता आणि राक्षसांचा त्रास सर्वत्र माजला होता. देव सुद्धा चिंतेत होते आणि या संकटाचे निवारण कसे करावे हे त्यांना सुचत नव्हते.

2/7
मग शेवटी भगवान विष्णूंनी मानवी रूपात जन्म घेण्याचा निर्णय घेतला, कारण पृथ्वीवर संतुलन आणि न्याय पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज होती. राम जन्म एक दैवी कथाच होती, रामायणातील प्रत्येक घटना आधीच ठरलेली होती. धर्म, कर्तव्य आणि मर्यादेचे महत्त्व आपल्याला रामायणातून समजतंय.

3/7
राजा दशरथांची चिंता आणि पुत्राची इच्छा: अयोध्येचे राजा दशरथ अतिशय पराक्रमी आणि न्यायप्रिय शासक होते, पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती, त्यांना अपत्य नव्हते. वय वाढत चालल्याने त्यांची ही चिंता अधिकच वाढत होती. आपल्यानंतर राज्याचा डोलारा सांभाळणारे कोणी नसेल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यांनी अनेक उपाय केले, पण काहीच साध्य झाले नाही. शेवटी त्यांनी आपले गुरु वशिष्ठ यांचा सल्ला घेतला, त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला.

4/7
पुत्रकामेष्टी यज्ञ: गुरू वशिष्ठांच्या सांगण्यावरून राजा दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. हा यज्ञ करण्यासाठी ऋषी ऋष्यश्रृंग यांना बोलावण्यात आले, ते या कार्यात खूप श्रेष्ठ मानले जात होते. यज्ञ विधीवत सुरू झाला आणि संपूर्ण राज्यात उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले. सर्व देवतांना प्रसन्न करण्यासाठी मंत्रोच्चार करण्यात आले आणि संपूर्ण श्रद्धेने यज्ञ पूर्ण झाला.

5/7
राण्यांना प्रसाद: यज्ञाच्या शेवटी अग्नी देव प्रकट झाले आणि त्यांनी राजा दशरथांना एका दिव्य खिरीने भरलेले पात्र दिले. त्यांनी सांगितले की, ही खीर राण्यांना खाऊ घातल्याने त्यांना पुत्रप्राप्ती होईल. राजा दशरथांनी ती खीर आपल्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिन्ही राण्यांना वाटून दिली. ही घटना रामांच्या जन्माची सुरुवात मानली जाते.

6/7
काही काळानंतर अयोध्येत आनंदाची लाट पसरली, राणी कौशल्या यांनी श्री रामांना जन्म दिला. त्याच वेळी कैकेयी यांनी भरताला आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण व शत्रुघ्न यांना जन्म दिला. रामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील नवमी तिथीला झाला, तो दिवस आजही राम नवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रामाच्या जन्माच्या वेळी संपूर्ण राज्यात उत्सवाचे वातावरण होते.

7/7
राम जन्माचे महत्त्व: रामाचा जन्म म्हणजे फक्त एका राजकुमाराचा जन्म नव्हता, तर ती धर्माचा विजय आणि अधर्माच्या अंताची सुरुवात होती. त्यांनी आपल्या आयुष्यात मर्यादा, सत्य आणि कर्तव्याचे पालन केले, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. जेव्हा जेव्हा जगात वाईट गोष्टी वाढतात, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी चांगुलपणा नक्कीच येतो, ही बाब आपल्याला रामायणातून शिकायला मिळते.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement