advertisement

8 वर्षांचं नातं मोडलं, दुःखात वेडी झाली अभिनेत्री; बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी गेली भोंदूबाबाच्या आहारी, आता 41 व्या वर्षी होणार आई

Last Updated:
Hindi TV Actress: एका अभिनेत्रीने तिचं मोडलेलं नातं पुन्हा मिळवण्यासाठी जे काही केलं आहे, ते पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
1/8
ग्लॅमरचं जग म्हटलं की, त्यात मैत्री, प्रेम आणि प्रेमभंग या गोष्टी सर्रास ऐकायला मिळतात. रिलेशनशिपमध्ये येणं आणि ब्रेकअप करणं या गोष्टी आता कोणासाठीही नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र एका अभिनेत्रीने तिचं मोडलेलं नातं पुन्हा मिळवण्यासाठी जे काही केलं आहे, ते पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

2/8
ही अभिनेत्री आहे हिंदी मालिकाविश्वात आघाडीवर असलेली दिव्यांना त्रिपाठी. अनेक हिंदी मालिका आणि शोमधून दिव्यांकाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र तिच्या आयुष्यात असा एक काळ आला होता, जेव्हा प्रेमात मिळालेल्या दुःखामुळे ती पूर्णपणे कोलमडून गेली होती.

3/8
दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा हे टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय कपल होतं. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांची ऑनस्क्रीन जोडी तुफान गाजली. बघता बघता त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तब्बल ८ वर्षे त्यांचं रिलेशनशिप सुरळीत सुरू होतं.

4/8
त्यांचं नात इतकं घट्ट होतं की चाहत्यांना वाटत होतं की हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकेल. मात्र अचानक त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि हे कपल एकमेकांपासून वेगळं झालं. ब्रेकअपनंतर दिव्यांकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला.

5/8
एका मुलाखतीत तिने याबाबत मोकळेपणाने खुलासा केला होता. तिने सांगितलं की आपलं प्रेम मिळवण्यासाठी तिने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. दिव्यांका म्हणाली होती की,
एका मुलाखतीत तिने याबाबत मोकळेपणाने खुलासा केला होता. तिने सांगितलं की आपलं प्रेम मिळवण्यासाठी तिने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. दिव्यांका म्हणाली होती की, "मी प्रेमात इतकी वेडी झाले होते की, शरदला परत मिळवण्यासाठी मी अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारला होता. मला वाटायचं की कोणातरी त्याच्यावर काळा जादू केला आहे. त्याला वाचवण्यासाठी आणि माझ्याकडे परत आणण्यासाठी मी शक्य ते सर्व केलं."
advertisement
6/8
आयुष्यातील या मोठ्या वादळाचा परिणाम तिच्या कामावरही झाला. ती अनेकदा शूटिंगच्या दरम्यान ढसाढसा रडायची. अखेर तिला जाणीव झाली की, जर एखाद्याचं प्रेम मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागत असेल, तर ते खरं प्रेम असूच शकत नाही.

7/8
दरम्यान, 'ये है मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर दिव्यांकाची भेट विवेक दहियाशी झाली. या मालिकेत विवेक सहाय्यक भूमिकेत होता, तर दिव्यांका त्या मालिकेची मुख्य अभिनेत्री होती. सेटवर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१६ मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केलं आणि त्यांचा आनंदी संसार सुरू झाला.

8/8
नुकतंच दिव्यांकाने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली. लग्नाच्या १० वर्षांनंतर या सुखी जोडप्याच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी दिव्यांका आई होणार असून या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement