IPL 2026 : इन स्विंग, यॉर्कर, बाऊन्सर... अर्जुन तेंडुलकरचा भेदक स्पेल, ऋषभ पंत पाहातच राहिला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या आधी अर्जुन तेंडुलकरने लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यात भेदक स्पेल टाकला आहे. अर्जुन तेंडुलकरच्या बॉलिंगचा सामना करताना बॅटरना अडचणींचा सामना करावा लागला.
मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला अजूनही क्रिकेटच्या मैदानात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही, पण या आयपीएलमध्ये अर्जुनला सातत्याने संधी मिळतील आणि तो स्वत:ला सिद्ध करेल, अशी शक्यता आहे. याचंच ताजं उदाहरण लखनऊ सुपर जाएंट्सच्या इंट्रा स्क्वॉड सामन्यात पाहायाला मिळालं. अर्जुन तेंडुलकरने त्याच्या डावखुऱ्या फास्ट बॉलिंगने आपल्याच टीममधल्या बॅटरना अडचणीत आणलं.
अर्जुन तेंडुलकरचा भेदक स्पेल
सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरच्या भेदक स्पेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयपीएल 2026 मध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणार आहे. इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये अर्जुनच्या बॉलिंगचा सामना करत असताना लखनऊच्या बॅटरना संघर्ष करावा लागत होता, कारण अर्जुन एखाद्या आंतरराष्ट्रीय बॉलरसाखीच बॉलिंग करत होता.
Arjun Tendulkar is in the form of his life, no batsman is able to play him.
3rd ball : Missed leg stump
4th ball : Catch dropped
5th ball : Catch dropped
Feel for Arjun Tendulkar pic.twitter.com/lFg83Ybg6F
— Rupesh Kumar (@drona_17) March 24, 2026
advertisement
अर्जुन तेंडुलकरची ही बॉलिंग पाहून लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतही खुश झाला असेल, तसंच अर्जुनचा हा स्पेल पाहून ऋषभ पंत अर्जुनला या आयपीएलमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी देऊ शकतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकर 2021 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आला त्यानंतर 2025 पर्यंत अर्जुन मुंबईसोबतच होता, पण या 5 वर्षात त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. आतापर्यंत अर्जुन तेंडुलकरने फक्त 5 मॅच खेळल्या ज्यात त्याला 3 विकेट घेता आल्या आणि त्यांनी 13 रन केल्या आहेत. आता आयपीएलच्या या मोसमात अर्जुनला संधी मिळणार का नाही? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विन याच्या मते मात्र अर्जुनला या मोसमातही बेंचवरच बसावं लागू शकतं.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
Mar 25, 2026 5:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : इन स्विंग, यॉर्कर, बाऊन्सर... अर्जुन तेंडुलकरचा भेदक स्पेल, ऋषभ पंत पाहातच राहिला, Video







