advertisement

अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर पक्षाला झाल्या नकोशा, पक्षातून हकालपट्टी करा, सुनेत्रा पवारांकडे मागणी

Last Updated:

महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र देण्यात आलं आहे

News18
News18
नाशिक : बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अशोक खरातसोबत संगत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना चांगलीच महागात पडली. चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला. पण आता रुपाली चाकणकर आपल्याच पक्षाला नकोशा झाल्या आहेत. चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र देण्यात आलं आहे. या पत्रावर विविध महिला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष तसेच महिला सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांच्या सन्मान आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेला पक्ष असून, त्या मूल्यांवर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या निष्ठेनं काम करत आहेत. मात्र, अलीकडील घटनांमुळे पक्षाच्या तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
अशोक खरात याच्याशी संबंधित छळ प्रकरणात महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे उघड झाल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसंच यापूर्वीच्या काही वादग्रस्त प्रकरणांमध्येही त्यांच्या निष्काळजीपणामुळे पक्षाची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पक्षाची प्रतिमा मलीन
अशा नेतृत्वाखाली तळागाळातील महिला कार्यकर्त्यांना काम करणे कठीण होत असून, ग्रामीण भागात जनतेसमोर पक्षाची भूमिका मांडताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि मूल्यांचे रक्षण करण्यासाठी रूपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदासह सर्व पदांवरून तात्काळ काढून टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीवर तातडीने कारवाई करून पक्षाचे होणारे नुकसान टाळावं, अशी अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर पक्षाला झाल्या नकोशा, पक्षातून हकालपट्टी करा, सुनेत्रा पवारांकडे मागणी
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement