'अशोक खरातच्या आड मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न, 38 आमदार करंगळ्या कापायला गेले होते', आव्हाडांचा स्फोटक दावा
- Published by:Sachin S
Last Updated:
अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते. अशोक खरातकडे पुजा घालायला गेले होते, वेळ आली तर नावं उघड करू
मुंबई: अशोक खरात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. खरातने कसं महिलांना फसवलं आणि अधिकाऱ्यांनीही कशी साथ दिली याची माहिती आता समोर आली आहे. अशाातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. "पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले हे मुख्यमंत्री यांना माहीत आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सहा महिन्यांपूर्वी झाला होता, याची माहिती मुख्यमंत्र्यांना सुद्धा आहे' असा दावा आव्हाड यांनी केला.
अशोक खरात प्रकरणावर आज दुसऱ्या दिवशीही विधानसभेत पडसाद उमटले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर दावा केलाा आहे.
अशोक खरातने २०१७ साली एका पत्रकाराचा खून केला होता. एका वर्तमान पत्रात १० लेख छापून आले होते. पोलिसांनी खरातला या प्रकरणातवाचवण्याचा प्रयत्न केला. कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सहा महिन्यांपूर्वी झाला होता. हे मुख्यमंत्री यांना ही माहीत आहे, एकूण ३८ आमदारांची यादी आहे,
advertisement
अशोक खरात याला शासनाने पैसे दिले, सिन्नर येथील ट्रस्टला पैसे, अशोक खरात ने २००७ मध्ये बाळासाहेब तुपे नावाच्या पत्रकाराची हत्या करण्यात आली. दैनिक सकाळमध्ये अशोक खरात याच्यावर १० लेख लिहिले होते. महाराष्ट्र आणि पत्रकारांना सगळं माहित होतं. पण, पोलिसांना याची माहिती होती, पण तशी माहिती मंत्र्यांना द्यायची गरज होती की नाही, पोलिसांनी किती पैसे घेतले, चांगल्याा चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. चांगले चांगले अधिकारी खरातच्या इथं लोटांगण घालत होते.
advertisement
अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते. अशोक खरातकडे पुजा घालायला गेले होते, वेळ आली तर नावं उघड करू. ही सगळी माहिती ६ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाल्या, अशोक खरातसोबत बैठक झाली, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. अशी प्रकारच्या पूजा, जादू राजमान्यता देण्यात आली. टाक्या बांधण्यात आल्या होत्या. अशा कोण मोठा अशोक खरात आहे, वाईट या गोष्टीचं वाटतंय शाहु-फुले- आंबेडकर-शिवरायांच्या महाराष्ट्रात जादू टोण्याला महत्त्वं दिलं जात आहे,
advertisement
खरातकडे ३८ आमदारांची यादी
"खरातकडे ३८ आमदारांची लिस्ट आहे, जे त्यांच्याकडे जाणारे आणि करंगळी कापणाऱ्यांकडे, खरं आहे विखे पाटील यांचं ही बोट मी चेक करणार आहे. एसआरए पोस्टिंग, रस्ते बनवले जात आहे, शिक्षण खात्यातील पोस्टिंग खरातकडून केली जात होती. त्याचं जे ट्रस्ट आहे, त्यातील सदस्याला अटक का झााली नाही. हे सगळं महाराष्ट्राला कळू द्या, अशी मागणी आव्हाड यांनी केली.
advertisement
मंत्रिमंडळातील आमदार सहभागी
"वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी २ कोटी रुपये घेतले आहे. जेफरी एफ्स्टीनच्या फाईल जगाला कळू नये म्हणून इराणचं युद्ध सुरू आहे. त्यामुळे त्याचा खून झाला, तशीच भिती मला अशोक खरात केसमध्ये वाटायला लागली आहे, त्याना वाचवा, कॅमेरासमोर खरातला ठेवा. देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला धक्का लावण्यासाठी अनेक आमदार त्या ठिकाणी लाईन लावून बसले होते.
advertisement
त्यांच्या बाजूला म्हणजे एकनाथ शिंदे यांचं नाव घेत नाही नाही तर गैरसमज होईल. त्यांचं नाव यामध्ये नाही. पण त्यांच्या मंत्रिमंडळाातील काही आमदार हे खरातकडे रांग लावून होते. हे देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व माहीत आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आव्हाडांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 5:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'अशोक खरातच्या आड मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न, 38 आमदार करंगळ्या कापायला गेले होते', आव्हाडांचा स्फोटक दावा







