फेब्रुवारीत कधी लागणार सूर्यग्रहण?
पंचांगानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण कंकणाकृती (Annular Solar Eclipse) स्वरूपाचे असेल. खगोलशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, आफ्रिकेतील काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या परिसरात दिसणार आहे. भारतातून हे ग्रहण दृश्यमान नसल्यामुळे, सुतक काळ भारतात लागू होणार नाही. हे ग्रहण दुपारी सुमारे 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 8 वाजेपर्यंत चालेल.
advertisement
कोणत्या राशी आणि नक्षत्रांवर होणार अधिक परिणाम?
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, हे सूर्यग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीतील तसेच शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर या ग्रहणाचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवू शकतो. या काळात आरोग्याशी संबंधित तक्रारी, मानसिक अस्वस्थता तसेच आर्थिक निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे करार, गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना विशेष दक्षता बाळगण्याचा सल्ला ज्योतिषी देत आहेत. कोणावरही सहज विश्वास ठेवणे या काळात नुकसानकारक ठरू शकते.
या राशींनी राहावे सावध
सिंह (Leo) – वैवाहिक आयुष्यात गैरसमज वाढू शकतात. भागीदारीत केलेल्या व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे. संवादात संयम ठेवणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक (Scorpio) – घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची अचानक काळजी घ्यावी लागू शकते.
कुंभ (Aquarius) – मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. चालू असलेली कामे रखडू शकतात. निर्णय घेताना घाई टाळावी.
मकर (Capricorn) – आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा मोठ्या व्यवहारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय टाळावे?
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात सूर्यदेवाला अर्पण केलेले मंत्र, गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दानधर्म करावा, असेही सांगितले जाते. गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. धारदार वस्तू वापरणे टाळावे, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. तसेच, ग्रहणाच्या वेळी नकारात्मक विचार टाळून शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
