सोयाबीन आणि कांद्याच्या दरात पुन्हा घट, कपाशीला किती मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज विविध पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. कपाशीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली, तर कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारभावात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावती : राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज विविध पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. कपाशीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली, तर कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारभावात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आवक देखील खूप कमी झाली आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
कपाशीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 338 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. ही संपूर्ण आवक फक्त चंद्रपूर कृषी बाजार समितीत झाली. येथे कपाशीला किमान 7 हजार 900 तर कमाल 8 हजार 171 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. रविवारी नोंदवलेल्या बाजारभावांच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
advertisement
कांद्याचे दर घसरले
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण 33 हजार 361 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर बाजारात 28 हजार 089 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या बाजारात कांद्याला किमान 250 ते कमाल 1 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सोलापूर बाजारात आवक झालेल्या लाल कांद्याला प्रतिक्विंटल 1 हजार 820 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. मात्र रविवारी मिळालेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घट झाली आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात घट
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची अत्यल्प आवक नोंदवण्यात आली. बीड बाजारात केवळ 1 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्याठिकाणी सोयाबीनला 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. रविवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या बाजारभावात घट नोंदवण्यात आली आहे.
तुरीच्या दरातही नरमाई
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 6 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये बीड बाजारात 5 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक झाली. येथे तुरीला किमान 7 हजार 300 ते कमाल 7 हजार 576 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. रविवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 8:31 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन आणि कांद्याच्या दरात पुन्हा घट, कपाशीला किती मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा







