TRENDING:

रामनवमी संपताच ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळलं, आजपासून गोल्डन टाइम झाला सुरू

Last Updated:

27 march horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 27 मार्च, आजचा शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला अर्पण मानला जातो. ग्रह-नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीमुळे आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 27 मार्च, आजचा शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला अर्पण मानला जातो. ग्रह-नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीमुळे आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. लवकरच सूर्य, शनि आणि मंगळ या ग्रहांचे संक्रमण होणार असल्याने काही राशींना याचा सकारात्मक परिणाम जाणवू शकतो. मग कोणत्या पाच राशींसाठी दिवस लाभदायक ठरेल? ते जाणून घेऊया.
Horoscope News
Horoscope News
advertisement

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि सन्मानही मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ संकेत घेऊन येईल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेण्यात यश येईल. मुलांच्या प्रगतीत आनंद मिळेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यातही रुची वाढेल.

advertisement

कन्या रास

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. सरकारी योजनांचा लाभ होऊ शकतो. व्यवसाय किंवा नोकरीत नवीन ऑर्डर्स मिळतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

advertisement

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण पण समाधानकारक राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, मात्र तो सुखद आणि फलदायी ठरेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
रामनवमी संपताच ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळलं, आजपासून गोल्डन टाइम झाला सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल