TRENDING:

APMC Market: लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video

Last Updated:

महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. सध्या बाजारातील कांद्याची आवक चांगली असली तरी आज 26 मार्च रोजी मात्र कांद्याच्या आवकेत मोठी घट दिसून आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. सध्या बाजारातील कांद्याची आवक चांगली असली तरी आज 26 मार्च रोजी मात्र कांद्याच्या आवकेत मोठी घट दिसून आली. राज्याच्या बाजारात आज केवळ 69 हजार 102 क्विंटल कांद्याची एकूण आवक राहिली. यामध्ये लाल कांद्याला नाशिक मार्केटमध्ये 825 रुपये, सोलापूर मार्केटमध्ये 700 रुपये तर जळगाव मार्केटमध्ये 800 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. कालच्या तुलनेत आजचे भाव अनखी ढासळले. तसेच उन्हाळी कांद्याला अहिल्यानगर मार्केटमध्ये मिळालेला 1175 रुपये सरासरी भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
advertisement

लिंबूची आवक 

बाजारातील लिंबाची मागणी वाढत असून आवक दबावातच आहे.राज्याच्या मार्केटमध्ये आज 768 क्विंटल आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 490 क्विंटल लिंबूस 3000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल लिंबूस 10500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

द्राक्ष आवक 

राज्याच्या कृषीमार्केट मध्ये द्राक्ष आवक वाढलेली दिसली. आज 1325 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 849 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सांगली बाजारात आवक झालेल्या 14 क्विंटल द्राक्षास 4500 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

केळीची आवक 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 62 क्विंटल आवक पुणे बाजारात राहिली. त्यास प्रतीनुसार 500 ते 1400 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल