PM Kisan Yojana : कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा! PM Kisan योजनेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) चा २२ वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष २३ व्या हप्त्याकडे लागले आहे.
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) चा २२ वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष २३ व्या हप्त्याकडे लागले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत ई-केवायसी प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. आता शेतकरी 'फेस ऑथेंटीकेशन' सुविधेच्या मदतीने घरबसल्या सहजपणे आपले ई-केवायसी पूर्ण करू शकणार आहेत.
ओटीपीच्या अडचणींना पर्याय
यापूर्वी ई-केवायसीसाठी ओटीपीची आवश्यकता होती. मात्र नेटवर्क समस्या किंवा ओटीपी उशिरा मिळणे यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. नवीन फेस ऑथेंटिकेशन सुविधेमुळे या अडचणी दूर होणार असून, केवळ चेहरा स्कॅन करून काही मिनिटांत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.
सरकारच्या मते, या बदलामुळे २३ व्या हप्त्याच्या वितरणात विलंब होण्याची शक्यता कमी होईल.
advertisement
घरी बसून ई-केवायसी कशी करायची?
शेतकऱ्यांनी सर्वप्रथम अधिकृत पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करावे.
अॅपमध्ये ‘e-KYC’ पर्याय निवडून ‘Face Authentication’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर फोनचा कॅमेरा सुरू होईल. कॅमेऱ्यासमोर चेहरा दाखवून काही सेकंदांत पडताळणी पूर्ण होते आणि ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होते.
advertisement
फेस ऑथेंटिकेशन करताना कोणती काळजी घ्यायची?
फेस स्कॅन करताना पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे, जेणेकरून कॅमेरा चेहरा स्पष्टपणे ओळखू शकेल. तसेच चेहरा स्थिर ठेवून थेट कॅमेऱ्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे. काही सेकंदांतच प्रणाली आधार डेटाशी पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण करते.
ई-केवायसी न केल्यास हप्ता अडकण्याची शक्यता
ई-केवायसी वेळेत पूर्ण न केल्यास पुढील हप्त्याचे पैसे मिळण्यात विलंब होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही नवी सुविधा उपयुक्त ठरणार आहे, कारण नेटवर्क समस्यांमुळे त्यांना पूर्वी अडचणींचा सामना करावा लागत होता. आता त्यांना कुठेही जाण्याची गरज नसून संपूर्ण प्रक्रिया घरातूनच करता येणार आहे.
advertisement
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी आणि तो लघु किंवा अल्पभूधारक शेतकरी असावा. याशिवाय, 10,000 किंवा त्याहून अधिक मासिक निवृत्तीवेतन घेणारे, आयकर भरणारे किंवा संस्थात्मक जमीनधारक या योजनेसाठी अपात्र ठरतात. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, जमिनीच्या मालकीचे पुरावे, मोबाईल नंबर (आधारशी जोडलेला) आणि नागरिकत्वाचा पुरावा आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 9:00 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan Yojana : कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा! PM Kisan योजनेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय







