advertisement

फार्महाऊसवर 21 जिवंत काडतुसं, अशोक खरातला बंदूक कुणी दिली? खळबळजनक माहिती समोर

Last Updated:

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्याच्याविरोधात ९ गुन्हे दाखल झाले आहेत.

अशोक खरात
अशोक खरात
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्याच्याविरोधात ९ गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक महिला आणि तरुणी पुढे येऊन अत्याचाराचा पाढा वाचत आहेत. दरम्यान, अशोक खरातच्या फार्महाऊसवर सापडलेल्या बंदुकीबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. छापेमारीत जप्त केलेलं शस्त्र अनधिकृत नसून त्याचा परवाना खुद्द नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

शस्त्र परवान्याचा इतिहास आणि नूतनीकरण

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने शस्त्र बाळगण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर अर्ज केला होता. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याला हा शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करत १ जानेवारी २०२४ रोजी या परवान्याचं नूतनीकरण देखील करण्यात आल्याची नोंद सरकारी दप्तरी आढळली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच हा परवाना देण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.
advertisement

२१ काडतुसे जप्त; ५ काडतुसांचा वापर कुठे?

गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस कोठडीतील तपासादरम्यान खरातच्या फार्महाऊसची झडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना तेथे २१ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. मात्र, तपासात असेही निष्पन्न झालं आहे की, फार्महाऊसमध्ये ५ वापरलेली काडतुसंही आढळून आली. ही पाच काडतुसे नक्की कोणावर चालवण्यात आली किंवा त्यांचा वापर शिकारीसाठी की दहशत निर्माण करण्यासाठी केला गेला, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
advertisement

परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

भोंदू बाबा म्हणून खरातचे काळे कारनामे उजेडात आल्यानंतर आता प्रशासनाने आपली चूक सुधारण्यास सुरुवात केली आहे. खरातच्या नावावर असलेला शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. एका भोंदू बाबाला शस्त्राचा परवाना मिळतोच कसा, आणि त्याचे नूतनीकरण कोणत्या आधारावर केले गेले, यावरून आता प्रशासकीय वर्तुळातही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
फार्महाऊसवर 21 जिवंत काडतुसं, अशोक खरातला बंदूक कुणी दिली? खळबळजनक माहिती समोर
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement