Ashok Kharat Case: खरातचा सर्वात घाणेरडा गेम त्याच्यावर उलटला! स्वतःची सुटका करण्यासाठी पीडितेलाच बनवले हत्यार; डाव फसला अन् कसं फुटलं बिंग..
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case : राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या 'खरात फाइल्स' प्रकरणात आता अत्यंत घृणास्पद वास्तव समोर आले आहे.
नाशिक: राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या 'खरात फाइल्स' प्रकरणात आता अत्यंत घृणास्पद वास्तव समोर आले आहे. मुख्य आरोपी अशोक खरात याने आपल्या विकृत वासनेचे साम्राज्य वाचवण्यासाठी चक्क एका पीडित महिलेलाच ढाल बनवून, स्वतःच्या ऑफिसबॉयला 'बळीचा बकरा' बनवल्याचे एसआयटी (SIT) तपासात उघड झाले आहे.
पापाचे साम्राज्य आणि स्पाय कॅमेऱ्याचा विळखा
या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेला ऑफिसबॉय नीरज, याने खरातचे काळे कारनामे उघड करण्यासाठी कार्यालयात गुपचूप 'स्पाय कॅमेरे' लावले होते. खरात आणि नीरजचे काही कारणाने वाद झाले होते. या कॅमेऱ्यांमध्ये अनेक महिलांवरील अत्याचाराचे पुरावे कैद झाले. जेव्हा नीरजने हे पुरावे संबंधित पीडित महिलांना दाखवण्यास सुरुवात केली, तेव्हा खरातचे धाबे दणाणले. आपले गुन्हे उघडकीस येतील या भीतीने खरातने बचावासाठी एक अत्यंत खालच्या पातळीचा डाव रचला.
advertisement
पीडितेला धमकावून रचला बनाव
शिर्डीतील एका २४ वर्षीय पीडित तरुणीने जेव्हा या पुराव्यांच्या आधारे खरातला जाब विचारला, तेव्हा खरातने आपली राजकीय आणि आर्थिक ताकद वापरून तिच्यावर दबाव टाकला. "नीरजनेच तुझे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ (बदलले) केले आहेत आणि तो तुला बदनाम करतोय," अशी खोटी माहिती देऊन तिला घाबरवले. इतकेच नाही, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी खरातने याच पीडितेच्या माध्यमातून नीरजविरुद्ध पोलिसांत आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
advertisement
एसआयटी तपासात बुरखा फाटला
नीरजला तुरुंगात पाठवून आपण सुरक्षित राहू, असा खरातचा कयास होता. मात्र, एसआयटीने जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला, तेव्हा खरातचा हा 'मास्टर प्लॅन' पूर्णपणे फसला. नीरजने लावलेल्या कॅमेऱ्यातील दृश्ये खरी असून, खरातनेच महिलांचे शोषण केल्याचे तपासात स्पष्ट झाले. स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी एका पीडितेचा वापर करून दुसऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा खरातचा खोटारडेपणा आता चव्हाट्यावर आला असून, पोलिसांनी या मुख्य सूत्रधाराला गजाआड केले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: खरातचा सर्वात घाणेरडा गेम त्याच्यावर उलटला! स्वतःची सुटका करण्यासाठी पीडितेलाच बनवले हत्यार; डाव फसला अन् कसं फुटलं बिंग..






