हे उपाय भाग्य पालटू शकतात -
ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि झाडूशी संबंधित अनेक शुभ संकेत आहेत. झाडू गरिबी, त्रास दूर करतो. याशिवाय, झाडू कुटुंबातील लोकांचे अनेक प्रकारचे आजार आणि दुःख दूर ठेवतो. झाडूचे अनेक उपयोग असले तरी, अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला हा उत्तम उपाय तुमचे भाग्य बदलू शकतो. या उपायामुळे तुमच्या पैशाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीबही उजळू शकते.
advertisement
सूर्यास्तानंतर हे काम करू नका -
कधीच सूर्यास्तानंतर घर झाडू नये, अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही अशी चूक करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि घरात गरिबी वास करते, असे मानले जाते. तसेच, सूर्यास्तानंतर घरातील कचरा टाकू नये.
हार मानली नाही, जिद्दच होती! या राशींचे आता नशीब पालटणार; संघर्षाचा शेवट सुखात
झाडू या दिशेला ठेवा -
अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडू खरेदी करावा आणि या दिवशी जुना झाडू काढून नवीन झाडू वापरावा. झाडू बदलण्यासाठी ही तिथी सर्वोत्तम मानली जाते. या शुभ दिवशी झाडू उघड्या आकाशाखाली ठेवू नये. बरेच लोक झाडू टेरेस किंवा बाल्कनीवर ठेवतात, तसं करणं चुकीचं आहे. झाडू उघड्यावर ठेवल्याने जीवनात त्रास वाढतो. झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे वायव्य दिशा.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा हा उत्तम उपाय -
अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडूखाली चांदीचे नाणे ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. तुमच्याकडे चांदीचे नाणे नसेल तर तुम्ही एक रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. चांदीचे नाणे किंवा एक रुपया ठेवण्यापूर्वी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ते पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडा. यानंतर ते देवी लक्ष्मीजवळ ठेवा, नंतर रात्री झाडूखाली ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी ते नाणे घरातील पैशांच्या ठिकाणी ठेवा. पुढील अक्षय तृतीयेपर्यंत चांदीचे नाणे किंवा एक रुपया तिथेच ठेवा.
गजलक्ष्मी राजयोग या राशींच्या नशिबात; लवकरच कायापालट करणाऱ्या वार्ता कानी पडणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)