अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही हे काम करू नये -
या गोष्टी करू नका - अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी, खोटे बोलणे किंवा जुगार खेळणे इत्यादी कोणतेही चुकीचे काम करू नका. या गोष्टी केल्याने घरातून आशीर्वाद, चांगल्या गोष्टी निघून जातात आणि आयुष्यात दीर्घकाळ वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. कोणत्याही परिस्थितीत वाद आणि संघर्ष टाळले पाहिजेत. या दिवशी मोठ्यांच्या अपमानामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते.
advertisement
कधी साफसफाई करावी - अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळनंतर चुकूनही झाडू नका. झाडूमध्ये लक्ष्मी देवी वास करते, असे मानले जाते. संध्याकाळनंतर घर झाडू मारणे अशुभ मानले जाते. या दिवशी घर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या. धनाची देवी लक्ष्मी कधीही अस्वच्छ घरात प्रवेश करत नाही. या दिवशी घर नीटनेटके-स्वच्छ न ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि दुर्दैव येऊ शकतं. सकाळनंतर सूर्यास्तापूर्वी स्वच्छता करा. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावरही बसू नये.
अक्षय तृतीयेपूर्वीच शनी देणार गिफ्ट! या राशींचा सुवर्णकाळ सुरू करेल, नशिबाची साथ
अन्न आणि पाणी - अक्षय तृतीयेला कोणताही गरजू व्यक्ती, भिकारी किंवा प्राणी-पक्षी तुमच्या दारात आला तर त्यांना अन्न आणि पाणी दिल्याशिवाय जाऊ देऊ नका. असे न केल्यास मिळवलेल्या पुण्यांचे फायदे मिळत नाहीत. देवी लक्ष्मी कुटुंबावर क्रोधित होते आणि दुर्दैव आपली साथ सोडत नाही.
उधार घेणे महागात पडेल - अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेऊन खरेदी करू नये. असे केल्याने समृद्धी नाही तर गरिबी येते. या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार दान करा. अक्षय तृतीयेला गरजूंना नक्कीच मदत करावी.
गजलक्ष्मी राजयोग या राशींच्या नशिबात; लवकरच कायापालट करणाऱ्या वार्ता कानी पडणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)